पुणे: दुचाकीमुळे पाणी अंगावर उडाले, हेल्मेटने केली बेदम मारहाण

पुणे, दि. १६/०८/२०२२ – रस्त्यांवरील खड्डयांचा वाद आता हातघाईवर आल्याचे दिसून आले आहे. पावसामुळे खड्डयात साचलेले पाणी दुचाकीमुळे अंगावर उडाल्याने रागातून दोघांनी तरूणाला बेदम मारहाण केली. आरोपींनी तरूणाला हेल्मेटने डोक्यात आणि तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना ११ ऑगस्टला रात्री सव्वा अकराच्या सुमारास धनकवडीतील शंकर महाराज मठ परिसरात घडली.

 

अभिषेक उमेश कदम (वय २२ रा. चव्हाणनगर, धनकवडी) याच्यासह साथीदारांविरूद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौस्तुभ सतीश साबळे (वय २७, रा. संभाजीनगर, धनकवडी ) यांनी तक्रार दिली आहे.

 

कौस्तुभ ११ ऑगस्टला दुचाकीवरून शंकर महाराज मठ परिसरातून जात होते. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्डयात त्यांची दुचाकी गेली. त्यामुळे शेजारून दुचाकीवर चाललेल्या अभिषेक आणि त्याच्या साथीदाराच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे रागावलेल्या अभिषेकने कौस्तुभला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. त्यांना शिवीगाळ करीत हातातील हेल्मेट कौस्तुभच्या डोक्यात आणि चेहNयावर मारून गंभीररित्या जखमी केले. उपचार घेतल्यानंतर कौस्तुभने पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत.