पुणे, ११ एप्रिल २०२५: कात्रज परिसरातील आगम मंदिर येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबविणे आणि राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी पुढील आठवड्यात गुरुवार, दि. १७ एप्रिल २०२५ रोजी महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारे भाग :
निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, भारती विहार, चंद्रभागानगर, सावंतविहार, सावंत गार्डन, वंडर सिटी, कदम प्लाझा, ज्ञान्सी गार्डन, माणिक मोती, नारायणी धाम परिसर, दत्तनगर, संतोषनगर, आंबेगाव बुद्रुक गावठाण, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी रोड, धबाडी व परिसर.

More Stories
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश