December 2, 2025

Pune: शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे, १७ नोव्हेंबर २०२५ : खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रदरम्यान नव्या जलवाहिनीचे जोडणे व मीटर बसविण्याच्या कामासाठी गुरुवारी (ता. २०) पुणे शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. २१) उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रापर्यंत ३ हजार मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या मुख्य लाईनला दोन १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या जोडण्याचे काम तसेच फ्लो मीटर बसविण्याची प्रक्रिया गुरुवारी पार पडणार आहे. हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, भामा-आसखेड धरणातून नगर रस्त्यावरील भागात सुरू असलेला पाणीपुरवठा नियमित राहणार असून, त्या परिसरात कोणताही अडथळा येणार नाही. मात्र उर्वरित शहरात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले.

ज्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार:

पर्वती एमएलआर, एचएलआर, एलएलआर टाकी परिसर

वडगाव शुद्धीकरण केंद्र

राजीव गांधी पंपिंग स्टेशन

लष्कर जलकेंद्र

चिखली जलकेंद्र

वारजे जलकेंद्र, वारजे फेज १ व २

चांदणी चौक टाकी

गांधी भवन टाकी

पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी

एसएनडीटी एमएलआर व एलएलआर टाकी

चतुःश्रृंगी टाकी

होळकर जलकेंद्र टाकी

खडकवासला जॅकेवेल

गणपती माथा

जुने वारजे जलकेंद्र

नव्याने समाविष्ट गावांतील बूस्टर केंद्र