पुणे: आम्ही गटारातील घाण आहोत मग परत कशाला बोलावत- आमदार शहाजीबापू पाटील

सासवड, ०२/०८/२०२२: राज्यामध्ये सत्तापालट झाल्यापासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने आम्हाला गद्दार आणि गटारीतील घाण असे बोलत आहेत. मात्र, आम्ही जर तुम्ही म्हणत असाल, तसे असल्यास आम्हाला परत मातोश्रीवर कशाला बोलावता, असा थेट सवाल शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी विचारला आहे.

 

शिवसेनेचे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागांमध्ये फिरुन पक्ष संघटना मजबूत करीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासहीत बंडखोरी करुन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेल्या ४० आमदारांचा आदित्य हे अनेक सभा आणि भाषणांमध्ये गद्दार म्हणून उल्लेख करताना दिसत आहेत. आदित्य यांनी या बंडखोरांवर केलेल्या टीकेवरुन अनेकदा नाराजीही बंडखोरांनी व्यक्त केलेली असताना आता सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे.

 

आदित्य ठाकरे हे रागाच्याभरात आम्हाला फार टाकून बोलतायत,’ ‘सारखं गद्दार गद्दार बोलतायत. केवढ काय बोललेत ते. गटारातील घाण आहे, गद्दार आहेत. ही घाण वाहून जाऊ द्या,’ असे म्हणत टीकेसंदर्भातील नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य यांनी केलेली टीका योग्य आहे असे म्हटले तरी मग आम्ही गटारातील घाण आणि गद्दार असू तर आम्हाला परत का पक्षामध्ये बोलवत आहात असा प्रश्न बंडखोरी करणा? या शहाजीबापू यांनी विचारलाय.

 

‘चला ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गटाराची घाण आहे. तुम्ही म्हणताय आम्ही गद्दार आहोत ते ही ठीक आहे. एकाबाजूला तुम्ही आम्हाला गटाराची घाण म्हणता. पण मग पुन्हा ज्याला याचंय त्याने या सांगून बोलवताय कशाला आम्हाला? तिथं काय काम आहे आमचं?’ असं शहाजीबापू यांनी आदित्य ठाकरेंना विचारले आहे.