October 21, 2025

पुणे: सरकार जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला आमचं पाठिंबा, फक्त आम्हाला विश्वासात घ्या: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे, २४ एप्रिल २०२५: पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला असून दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती देत सर्वपक्षीय बैठकीत आम्हाला विश्वासात घेण्यात यावं आम्ही सरकार जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला आमचं पाठिंबा असणार आहे, अस यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या संतोष जगदाळे कुटुंबीयांची भेट राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की काश्मीर मध्ये जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. हे सातारा जिल्ह्यातील मूळचं कुटुंब आहे हे पुण्यात स्थायिक आहेत. त्यांना सांत्वन करण्यासाठी आज आलो होतो. महाराष्ट्रातील जी कुटुंब आहेत ज्यांचं कुणीतरी या हल्ल्यात गेला आहे तिथं सरकारने जाऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत तसेच जे पर्यटक अडकले आहे त्या सगळ्यांना सरकारने विशेष विमाने परत आणलं पाहिजे. ही खूप मोठी हानी आहे जगदाळे कुटुंबाचं खूप मोठ नुकसान झालं आहे, अस यावेळी चव्हाण म्हणाले.

ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने सर्वांना विश्वासात घेत देश एक आहे आणि आम्ही एकसंघ या आतंकवाद्यांना तोंड देणार आहोत हा संदेश जाण महत्त्वाच आहे. अश्या प्रसंगी राजकीय पक्षांनी आपल्याला फायदा मिळतोय का हे न पाहता या संकटाला तोंड दिल पाहिजे. सरकार जे काही निर्णय घेईल त्यामागे आम्ही असू आणि ही आमच्या पक्षाची भूमिका असणार आहे फक्त सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे असं यावेळी चव्हाण म्हणाले.

यावेळी संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संपूर्ण घटनाक्रम सांगत आमच्या समोरच माझ्या पतीच्या डोक्यात कानात गोळ्या मारण्यात आल्या आणि जे झोपलेली लोक होती त्यांना देखील गोळ्या मारण्यात आल्या. ते लोक मजहब च कलाम म्हणायला लावत होते आणि ज्यांना येत नव्हतं त्यांना गोळ्या मारत होते अस यावेळी संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी सांगितलं.