पुणे: येरवड्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

येरवडा, ०२/११/२०२२- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरातील जवाननगरमध्ये घडली. पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

अंकिता अनिल तांबूटकर (वय ४५, रा. जय जवाननगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अनिल मनोहर तांबूटकर (वय ५०) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

अंकिता आणि अनिल तांबूटकर यांच्यात कौटुंबिक वाद होत होते. त्याशिवाय अनिल पत्नी अंकिताच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. त्यांच्यातील भांडणे मागील काही दिवसांपासून वाढली होती. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अनिलने पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसोबत भांडण केले. त्याच रागातून त्याने अंकितावर चावूâने वार करून गंभीर जखमी केले.

घटनेची महिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंकितला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली