पुणे: करोनामुळे आर्थिक स्रोत बंद झालेल्या भुकेल्या जीवांसाठी वानवळा

पुणे, ७ जून २०२१: कोरोनाच्या महामारीमुळे राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबाचे आर्थिक स्रोत बंद झाले. याचे भान ठेवत काही व्यक्ती समोर येऊन अशा कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले आहेत. मिरज येथील ज्युबिली कन्या शाळेतील १९८५ च्या बॅच आणि औरंगाबाद येथील शारदा मंदिरमधील १९८५ ची बॅच यांच्यातील समान दुवा असलेल्या गीता सुपनेकर यांच्या सहकार्याने गरीब कुटूंबांना शिधा वाटप करण्यात आला.

ज्यूबिली शाळा व शारदा मंदिरातील विद्यार्थ्यांचे व्यवदायिक क्षेत्रात प्रगती साधत, कौटुंबिक जबाबदारी सांभाळत समाजकार्यातही व्यक्तिगत पातळीवर सक्रीय आहेत, तसेच एकत्रितपणेही उपक्रम राबवतात. ज्युबिली शाळेच्या मैत्रिणींच्या मनातही समाजाची उतराई होण्याचा विचार प्रबळ होत असतानाच कोरोना नावाचं संकट पुढ्यात आलं. त्यामुळे आपण एकत्रितपणे काय करू शकतो यावर चर्चा करताना हा विचार पुढे आला की शिधा वाटप करू शकतो. मग त्यात काय द्यावं, काय नाही, किती देता येईल, त्यासाठी किती खर्च येईल, वगैरे गणितं मांडली गेली आणि किमान ४०० ते ५०० गरजू कुटुंबांना चार आठ दिवस पोटाला अन्न मिळेल इतपत मदत करायची झाली तर साधारणपणे घरटी पाचशे, साडेपाचशे रुपये शिधा घेण्यासाठी लागतील हे लक्षात आले. किमान पाचशे रुपये किंवा अधिक रक्कमही सर्वसामान्य लोकांना देणे शक्य असल्याने तेवढा निधी आपण लोकसहभागातून उभा करू शकतो असे वाटले. अर्थातच बजेट एवढं कमी होण्यासाठी चंदू भावनांनी मदतीचा भक्कम हात पुढे केला.

मदतीचा आराखडा तयार केल्यानंतर सोशल मिडियावर आपल्या मित्र मैत्रिणींना जमेल त्या मदतीचे आवाहन करण्यात आले, बघता बघता शेकडो हात हातात घेत मोठी मदत जमा झाली.

मातंग समाजाचे अध्यक्ष रवि आरडे, आणि जुना बाजार झोपडपट्टी विकास मंचच्या अध्यक्षा जयमालाताई कसबे हे दोघे मदतीला धावून आले. त्यांनी सुचवले की आपण दिव्यांग, अनाथ, वृद्ध असे जे लोक आहेत ज्यांना उपजीविकेचे सध्या काहीच साधन नाहीये, अशांना ही मदत देऊया. कोणत्या वस्तीमध्ये कुणाला वाटप करायचे, यासाठी तिथे व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.

यासाठी अपूर्वा जगताप, राज श्रीवास्तव लक्ष्मण बिरादार उर्फ पिंट्या, चंदू आणि दीपक भावनांनी राजा परमार, विसपुते काका, रवि आरडे, अनल्पा पेंडसे, आराधना व प्रफुल्ल दवे (अमेरिका), आकांक्षा आळेकर, सलील कुलकर्णी, विनया व हेमंत कुलकर्णी, चंदू व दीपक भावनांनी व मिनल विटेकर या सगळ्यांचे ही विशेष सहकार्य मिळाले.