पुण्यात किंग नाही तर किंगमेकर नक्की होणार: संजय राऊत

पुणे, ५/०६/२०२१: पुणे महापालिकेच्या निवडणूकीसाठी शिवसेना स्वतंत्र तसेच आघाडी करून ८० जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. यावेळी आम्ही किंग नाही तर किंगमेकर नक्की असू शकतो, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पुण्यात आज महापालिका निवडणुकीसंदर्भात पदाधिकार्यांशी शिवसेना भवन येथे चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्याचा आपल्याला फार करून घेता आला पाहिजे, असे बैठकीत पदाधिकार्यांना सांगितले. पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, स्वंतत्र निवडणूक लढवणे किंवा महाविकास आघाडीतील पक्षांशी युती करणे या दोन्ही पर्याांवर विचार करत आहोत. युती झाली तर शिवसेना किमान ८० जागा लढेवेल. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर येथे भगवा फडकतो यंदा पुण्यात किंग किंवा किंगमेकर नक्की होऊ, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

संघटना नसताना भाजपची सत्ता आली

भाजपची संघटना मजबूत नसतानाही महापालिकेत भाजपची सत्ता आली, अशीच सत्ता शिवसेनेची येईल. पण संघटनात्मक बांधनी, यावर लक्ष दिले जाईल.

केंद्रातही स्वबळावर सत्ता आणा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे स्पष्ट केले असले तरी काँग्रेसने हा प्रयोग करावा. बंगाल मध्ये ते स्वबळावर लढले होते, केंद्रात देखील स्वबळावर सत्ता येणार असेल तर शुभेच्छा आहेत, असे राऊत यांनी सांगितले.