पुणे: शादी डॉट कॉमवर झाली ओळख, सायबर चोरट्याने शिक्षीकेला साडेचार लाखांना गंडविले

पुणे, ३०/०९/२०२१: सोशल मीडियावरील आमिष सुशिक्षित तरूण-तरूणींना आर्थिंक संकटाच्या खाईत धकलत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शादी डॉट कॉमवर झालेल्या ओळखीतून सायबर चोरट्याने हडपसरमधील एका शिक्षीकेला गिफ्टच्या बहाण्याने जाळ्यात ओढून ४ लाख २८ हजार रूपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात मोबाईलधारकासह बँक खातेधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षीकेनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला उच्च शिक्षीत असून एका शाळेत शिक्षीका आहे. त्यांनी शादी डॉट कॉमवर संकेतस्थळावर स्वतःचे प्रोफाईल अपलोड केले होते. त्यानुसार सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेला फोन करून प्रोफाईल आवडल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यात ओळख झाल्याने आरोपीने महिलेला दुबईवरून मौल्यवान दागिणे आणि इतर वस्तु पाठविले सांगत विश्वास संपादित केला.

त्याने महिलेला फोन करून दिल्ली एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्याने सोने अडविल्याचे सांगितले. त्यावर कस्टम कर भरावा लागेल अशी थाप त्याने महिलेली मारली. त्यानंतर दुसNया मोबाईलधारक व्यक्तीने महिलेला फोन करून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. मौल्यवान वस्तु सोडविण्यासाठी कस्टम कर भरण्यास सांगितले. आरोपींनी वारंवार पैशासाठी तगादा लाल्याने महिलेनी विश्वास ठेवून तब्बल ४ लाख २८ हजार ८०० रूपये संबंधीत खात्यावर पाठविले. त्यानंतर आरोपींचा संपर्क न झाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर करीत आहेत.