पुणे: पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे दागिने चोरीला

पुणे, दि. ०९/०८/२०२२: पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलेच्या पिशवीतील ६५ हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ८ ऑगस्टला कोरेगाव- टाटागार्ड रूम बसप्रवासात घडली. याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

फिर्यादी महिला ८ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोरेगाव ते टाटा गार्डरूम विमानतळ असा बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील ६५ हजारांचे दागिने चोरून नेले. बसमधून खाली उतरताना महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एस.एन. लहाणे तपास करीत आहेत.