पिंपरी, २३ एप्रिल २०२५: पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. शहरातील विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पुणे मेट्रोला नागरिकांची वाढती पसंती मिळत आहे. सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६० हजार अशी आहे.
पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पीसीएमसी या मार्गिकेचा नैसर्गिक विस्तार असणाऱ्या पीसीएमसी ते भक्तीशक्ती चौक या मार्गिकृतील पहिल्या पिअर च्या कामाला दिनांक ६ जुलै २०२४ रोजी सुरु करण्यात आली होती. या मार्गिकेचे काम वेगाने सुरु असून,आज दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी या विस्तारित मार्गिकेवरील चिंचवड स्थानक ते आकुर्डी स्थानक या दरम्यान असणाऱ्या खंडोबा माळ चौक येथे सेगमेंट लाँचिंग गर्डरची उभारणी करण्यात आली आहे आणि पिअर नं ४५३ व ४५४ मधील १२ सेगमेंट लावण्याच्या कामाला सुरुवात झाली. या दोन खांबामधील १२ सेगमेंट पैकी आज ४ सेगमेंट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे, उर्वरित ८ सेगमेंट चे काम प्रगतीपथावर आहे. या विस्तारित मार्गिकेमध्ये १५१ पियर व १३३७ सेगमेंट असणार आहेत. १३३७ सेगमेंट पैकी ५१७ सेगमेंट चे कास्टिंग पूर्ण झाले आहे.
या विस्तारित मार्गिकेमध्ये चिंचवड स्थानक, आकुर्डी स्थानक, निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानक अशी ४ स्थानके आहेत. विस्तारित मार्ग पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्रमुख भागांना जोडेल. चिंचवड स्थानक व्यावसायिक, निवासी, औद्योगिक आणि धार्मिक स्थळे आणि चिंचवड भारतीय रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येईल. आकुर्डी स्थानक निवासी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांची पूर्तता करेल; निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानके निवासी, मनोरंजन आणि धार्मिक स्थळे जोडलीत आणि देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या निमशहरी भागांना जोडणाऱ्या शहर बस आगारांशी जोडण्यात येतील.
याप्रसंगी महामेट्रोचे व्ययस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, “पीसीएमसी ते निगडी मार्गावरील पहिल्या स्पॅन ची उभारणी सुरु झाली आहे. ही अत्यंत्य आनंदाची बाब आहे. आम्ही हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

More Stories
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत वाढवली
पिंपरी चिंचवडमध्ये ‘टाकाऊतून नवसृजन’; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अभिनव उपक्रम लोकप्रिय
पिंपरी चिंचवड: आमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!