पुणे: खराडीत वाहनाच्या धडकेत तरूण ठार, भाउ जखमी

पुणे, ११/०८/२०२१: भरधाव वाहनचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तरूण ठार झाला. त्याचा सख्खा भाउ गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खराडी गावठाण चौकात घडला. आर्य विनोद गलांडे वय १८ असे ठार झालेल्याचे नाव आहे. वेदांत गलांडे वय ११ असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांचे चुलते भास्कर गलांडे वय ४१ यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास भास्कर गलांडे हे दुचाकीवरून आर्य आणि वेदांत यांना क्रिकेट क्लबमध्ये सोडण्यासाठी चालले होते. त्यावेळी खराडी गावठाण चौकात एका वाहनचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने आर्य आणि वेदांत गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान आर्यचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.