पुणे, 20 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत आता पर्यंत अनिश्चित कामगिरी करणाऱ्या पुणेरी पलटण संघाने घरच्या मैदानावरील अखेरच्या साखळी सामन्यात बेंगळुरू बुल्स संघाचा 43-17 असा धुव्वा उडवून आव्हान कायम राखले
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत या विजयामुळे पुणेरी पलटण संघाने गुण तालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले. प्रो कबड्डी लीगचा पुण्याच्या फेरीतील कहरच सामना होता आत चेन्नई येथे 22 डिसेंबर पासून अखेरचा टप्पा सुरू होईल. पुणेरी पलटण संघाने पूर्वार्धात सामन्यावर वर्चस्व गाजवताना लवकरच 23-5 अशी आघाडी घेतली. एकूण 10पकडी करताना पुणेरी पलटण संघाने मध्यांतराला 20गुणांची आघाडी घेतली.
पूर्वार्धात दोन लोन चढवणाऱ्या पुणेरी पलटण संघाने उत्तरार्धाच्या सुरुवातीला तिसरा लोन चढवून 33-10 अशी निर्णायक आघाडी मिळवली. यानंतर मोहंमद रिझाचीयानेहने केलेले प्रयत्न आणि बुल्सक्या इतर खेळाडूंनी दिलेली साथ यामुळे बेंगळूरची पिछाडी कमी झाली. तरीही पलटण संघाने आपली आगेकूच कायम राखताना 26 गुणांनी दणदणीत विजयाची नोंद केली.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय