September 11, 2025

पुणेचा स्वच्छतेकडे प्रवास : यंदा देशात आठवा क्रमांक

पुणे, १७ जुलै २०२५ : स्वच्छ भारत अभियानाच्या २०२४ सालच्या अंतिम निकालात पुणे शहराने देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत आठवा क्रमांक पटकावला आहे. देशभरातील दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे मूल्यमापन करण्यात आले होते.

केंद्र सरकारकडून इ.स. २०१६ पासून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर शहरांचे मूल्यमापन करून त्यांना रँकिंग दिले जाते. गेली आठ वर्षे सलग इंदूर शहराने पहिल्या क्रमांकावर आपले वर्चस्व राखले असून, त्याला सेव्हन स्टार रँकिंग ही प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रात नवी मुंबई महापालिका दरवर्षी पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवत असते. मात्र पुणे महापालिकेला गेल्या काही वर्षांत फारशी मोठी झेप घेता आली नव्हती. यंदा मात्र पुण्याने चांगली भरारी घेत आठव्या क्रमांकावर पोहोचत सकारात्मक प्रगती केली आहे.

२०१९ मध्ये पुणे सत्याऐंशीव्या (३७) क्रमांकावर होते. २०२० मध्ये तो पंधरावा (१५) आणि २०२१ मध्ये थेट पाचव्या (५) क्रमांकावर झेपावला होता. मात्र २०२२ आणि २०२३ मध्ये सलग नववा (९) क्रमांक कायम राहिला. यंदा २०२४ मध्ये आठव्या (८) स्थानावर पोहोचत काहीशी सुधारणा झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, मागील वर्षी पुण्यापेक्षा लहान शहरे पुण्याच्या पुढे गेली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्या निकालाचे सखोल विश्लेषण करून कमतरता दूर करण्यावर भर दिला. त्याचाच परिणाम म्हणजे यंदा पुण्याची स्थिती सुधारली. तरीही प्रशासनाला आणखी वरच्या स्थानाची अपेक्षा होती.

देशातील पहिले तीन स्वच्छ शहरं – स्वच्छ सर्वेक्षण २०२४
१. इंदूर (मध्य प्रदेश) – सलग आठव्यांदा पहिला क्रमांक
२. सुरत (गुजरात) – दुसरे स्थान
३. नवी मुंबई (महाराष्ट्र) – तिसरे स्थान

पुणेचा गेल्या सहा वर्षांचा क्रमवारी प्रवास

२०१९ : सत्याऐंशीवा (३७) क्रमांक

२०२० : पंधरावा (१५) क्रमांक

२०२१ : पाचवा (५) क्रमांक

२०२२ : नववा (९) क्रमांक

२०२३ : नववा (९) क्रमांक

२०२४ : आठवा (८) क्रमांक