पंजाब नॅशनल बँक सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे संमेलन

पुणे, १७/१०/२०२२: पंजाब नॅशनल बँक  रिटायरीज  फोरम ,महाराष्ट्र (पी.एन.बी रिटायरींग  असोशिएशन ) यांच्या  रजत जयंती वर्षानिमित्त  व   पंजाब नॅशनल बँकेच्या  सेवानिवृत कर्मचार्‍याचे  वार्षिक स्नेह संमेलन आज  कोहिनूर मंगल कार्यालय येथे   संपन्न झाले.

.या    कार्यक्रमाला पंजाब नॅशनल बँक मंडल प्रमुख भुवनेश्वरी व्यंकटरमण  ,संतोष रावत,मुख्य प्रबंधक सर्कल ऑफिस पुणे, हेमंत कुलकर्णी, मुकुंद  गोखले  , एन.जी देवधर , आर पी अनावकर , पंकज बधानी  ,शामराव निकाळजे, किशोर जाधव ,  रोहिणी खिस्ती आणि  पुणे ,नाशिक, कोल्हापुर,नगर  व मुंबई येथून आलेले सुमारे दोनशे हून आधिक  माजी कर्मचारी  उपस्थित होते.

भुवनेश्वरी व्यंकटरामन म्हणाल्या” सेवानिवृत कर्मचारी हे पीएनबी परिवारातील  महत्वाचे घटक आहेत. त्यांचे बँकेच्या प्रगतीमधे मौलिक योगदान आहे. निवृत्त कर्मचार्‍र्‍याच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्याची  खात्री त्यांनी  दिली . सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे जीवन सुखकर होण्यासाठी  पंजाब नॅशनल बँक  रिटायरीज  फोरम करत असलेले कार्याचे त्यांनी कौतुक केले.”

 अरुण भावे ,विवेक कुलकर्णी,मिलिंद जोशी,अरुणा तिवारी (सामाजिक कार्य).एम.बी जोशी(प्रशिक्षण),अनंत रांगणेकर( ( युनियन संस्थापक) अशोक मणेल (संगीत)  या सभासदांचा  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी  केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

  अनंत रांगणेकर,सतिश मराठे,अनिल सावंत , मृणालकांत दाभाडे, रवीद्र अभ्यंकर,सौ  सुजाता खनाळे , विवेक बोरवणकर   यांच्या  गायन सदरीकरणाला   तसेच विजय  मेढेकर यांनी सादर केलेल्या माउथ ऑर्गनवरील   गाण्यांना  रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.