पुणे, 7 नोव्हेंबर, 2023: टेनिसनट्स यांच्या वतीने आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या मानेग्रो नरेंद्र सोपल मेमोरियल टेनिस क्लब अजिंक्यपद 2023 स्पर्धेत अंतिम फेरीत पीवायसी अ संघाने टेनिसनट्स रॉजर संघाचा 17-13 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पाषाण येथील एनसीएल टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पीवायसी अ संघाने टेनिसनट्स रॉजर संघाचा 17-13 असा पराभव केला. 90 अधिक गटात पीवायसीच्या अनुप मिंडा व ऋतू कुलकर्णी यांना टेनिसनट्स रॉजरच्या संदीप बेलुडी व जॉय बॅनर्जी यांनी 5-6 असे पराभूत केले. त्यानंतर 60 अधिक गटात पीवायसीच्या अभिषेक ताम्हाणेने अमोघ बेहेरेच्या साथीत टेनिसनट्स रॉजरच्या रवी कोठारी व राहुल कोठारी यांचा 6-4 असा तर 80 अधिक गटात पीवायसीच्या योगेश पंतसचिव व पराग नाटेकर यांनी अमित किंडो व नितीन सावंत यांचा 6-3 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अमित लाटे, ध्रुव मेड, केदार देशपांडे, तन्मय चोभे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी बसंघाने टेनिसनट्स राफाचा 16-13 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकवला. स्पर्धेतील विजेत्या पीवायसी अ संघाला करंडक व रुपये.41000/-, तर उपविजेत्या टेनिसनट्स रॉजर संघाला करंडक व रुपये.21000/- अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या पीवायसी ब संघाला करंडक व रु.10000/- आणि चौथा क्रमांकास टेनिसनट्स राफा संघाला करंडक व रु.7500/- अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मानेग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश माने, अतिरिक आयुक्त विजय देशमुख, कॅपोविटजचे संचालक समीर भामरे, टीइपी इंडियाचे गौतम सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिपक भापकर(पाटील), संजना बेलुडी, डॉ.प्रदीप कुंचूर, रोटरी क्लब औंधचे अध्यक्ष सचिन मोरलवार, अनिकेत वाकणकर आणि स्पर्धा संचालक सुधीर पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी:
पीवायसी अ वि.वि.टेनिसनट्स रॉजर 17-13(90 अधिक गट: अनुप मिंडा/ऋतू कुलकर्णी पराभुत वि.संदीप बेलुडी/जॉय बॅनर्जी 5-6; 60 अधिक गट: अभिषेक ताम्हाणे/अमोघ बेहेरे वि.वि.रवी कोठारी /राहुल कोठारी 6-4; 80 अधिक गट: योगेश पंतसचिव/पराग नाटेकर वि.वि.अमित किंडो/नितीन सावंत 6-3);
3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी लढत: पीवायसी ब वि.वि.टेनिसनट्स राफा 16-13(90 अधिक गट: अमित लाटे/ध्रुव मेड वि.वि.सुनील लुल्ला/अतुल करमपूरवाला 6-4; 60 अधिक गट: अमित नाटेकर/सारंग देवी पराभुत वि.सलील कुंचूर/शशांक माने 4-6; 80 अधिक गट: केदार देशपांडे/तन्मय चोभे वि.वि.ऐश्वर्या इंगळे/चेन्ना कुमार 6-3).
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय