पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील सामन्यात साहिल चुरी(नाबाद 99धावा) व गुरवीर सिंग सैनी(नाबाद 80) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 4 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 48 षटकांत 9 बाद 292धावा केल्या. यात विराज दारवटकरने 73 चेंडूत 10चौकारांच्या मदतीने 57 धावा, तर अश्कन काझीने 72 चेंडूत 9चौकार व 1षटकारासह 64 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 79 चेंडूत 74 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर अनुश भोसलेने 63 चेंडूत 9चौकार व 3षटकारासह 73 धावा आणि आदिल अन्सारीने 29 धावा काढून चौथ्या गड्यासाठी 42 चेंडूत 73 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पीवायसीकडून आदित्य डावरे(3-58), साहिल चुरी(2-67), गुरवीर सिंग सैनी(1-48), स्वराज चव्हाण(1-44) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
दुसऱ्या सामन्यात यश जगदाळे(99धावा) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा केवळ एका धावेच्या फरकाने थरारक विजय मिळवला.
खालील निकाल आहेत: उपांत्य फेरी:
पीवायसी मैदान: क्लब ऑफ महाराष्ट्र: 48 षटकांत 9 बाद 292धावा(अनुश भोसले 73(63,9×4,3×6), अश्कन काझी 64(72,9×4,1×6), विराज दारवटकर 57(73,10×4) ), राजवर्धन उंद्रे 37(41,3×4,2×6), आदिल अन्सारी 29(17), अभिनव तिवारी नाबाद 15, आदित्य डावरे 3-58, साहिल चुरी 2-67, गुरवीर सिंग सैनी 1-48, स्वराज चव्हाण 1-44 ) पराभुत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 47षटकात 6बाद 296धावा(साहिल चुरी नाबाद 99(80,9×4,2×6), गुरवीर सिंग सैनी नाबाद 80(66,5×4,4×6), अमेय भावे 44(60,7×4), श्रेयस वाळेकर 16, अनुश भोसले 1-38, आदिल अन्सारी 1-38); सामनावीर – साहिल चुरी; पीवायसी संघ 4 गडी राखून विजयी;
डीव्हीसीए मैदान: दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी: (यश जगदाळे 99(125,10×4,3×6), अंश धूत नाबाद 76(77,7×4,3×6), वैभव विभूते 3-30, संकेत फराटे 2-53)वि. वि.अंबिशियस क्रिकेट अकादमी: 45 षटकांत 8 बाद 235 धावा (ऋषिकेश बारणे 56(97,7×4), सचिन भोसले नाबाद 55(33,3×,4×6), रोहित हाडके 38(60), तनेश जैन 44(39,8×4,1×6), सोहम जमाले 2-19, मिझान सय्यद 1-33, टिळक जाधव 1-60; सामनावीर- यश जगदाळे; डीव्हीसीए संघ 1धावांनी विजयी
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा