पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना संघांचा विजय

पुणे, 27 नोव्हेंबर 2022: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब 19 वर्षाखालील चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना या संघांनी आपल्या घरच्या मैदानावर विजयी कामगिरी करत स्पर्धेत आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदान येथे झालेल्या सामन्यात साखळी फेरीत सोहम शिंदेच्या तुफान फलंदाजीच्या बळावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 22 यार्ड संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना यशराज खाडेच्या 55, चैतन्य बिरामणेच्या 43 व देवेंद्र पाटीलच्या 41 धावांसह 22 यार्ड संघाने 49 षटकांत सर्वबाद 231 धावा केल्या. 231 धावांचे लक्ष पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 42.5 षटकांत 4 बाद 232 धावांसह पुर्ण करत विजय संपादन केला. यात सोहम शिंदेने 103 चेंडूत 9 चौकार व एका षटकारासह 84 धावा करून संघाचा डाव मजबूत केला. साईराज चोरगेने 76 धावा करून सोहमला सुरेख साथ दिली. सोहम शिंदे सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत गौरव शिंदेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने व्हिजन संघाचा 29 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना डेक्कन जिमखाना संघाने 50 षटकांत 9 बाद 171 धावा केल्या. यात रिद्धेश भुरूकने 57 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गौरव शिंदे , रुद्रज घोसाळे व अथर्व सणस यांच्या अचूक गोलंदाजीपुढे व्हिजन संघ 42.2 षटकांत सर्वबाद 142 धावांत गारद झाला. 26 धावात 4 गडी बाद करणारा गौरव शिंदे सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

22 यार्डः 49 षटकांत सर्वबाद 231 धावा (यशराज खाडे 55(84,6×4,1×6), चैतन्य बिरामणे 43(54,4×4,1×6), देवेंद्र पाटील 41(50,3×4,1×6), आर्य पानसे 3-45, आर्चिसमन दास 2-34, स्वराज चव्हाण 2-35) पराभूत वि पीवायसी हिंदू जिमखाना: 42.5 षटकांत 4 बाद 232 धावा (सोहम शिंदे 84(103,9×4,1×6), साईराज चोरगे 76(98,11×4), स्वराज चव्हाण नाबाद 24(24, 4×4), साहिल नलगे 3-34)सामनावीर- सोहम शिंदे

पीवायसी हिंदू जिमखाना 6 गडी राखून विजयी

डेक्कन जिमखाना: 50 षटकांत 9 बाद 171 धावा(रिद्धेश भुरूक 57(87,7×4), रितेश राजक नाबाद 29(88,3×4), मानस कोंढरे 24(33,5×4), अर्णव अमृते 8-12, विकास सहानी 1-41 ) वि.वि व्हिजन : 42.2 षटकांत सर्वबाद 142 धावा(यश व्दिवेदी 30(75,1×4), विकास सहानी 22(15,1×4,2×6), गौरव शिंदे 4-26, रुद्रज घोसाळे 2-34, अथर्व सणस 2-17) सामनावीर-गौरव शिंदे

डेक्कन जिमखाना संघाचा 29 धावांनी विजय