पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या अधिक्याच्या जोरावर केडन्स संघ विजयी

पुणे, दि. 12 डिसेंबर 2022 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी  फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आर्या जाधव(5-23) आणि सिद्धेश वरघंटे(5-22) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा पहिल्या डावाच्या 45 धावांच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. केडन्स संघाने दुसऱ्या विजय नोंदवला. 
 
डीव्हीसीए क्रिकेट मैदानावरील सामन्यात आज डीव्हीसीएच्या 9षटकात 2बाद 25 धावांपासून खेळ पुढे सुरु झाला.तत्पूर्वी काल  केडन्स संघाने पहिल्या डावात 43.1 षटकात 151धावाच करू शकला. याच्या उत्तरात डीव्हीसीए संघाचा डाव 38षटकात सर्वबाद 106धावावर संपुष्टात आला. यात किरण मोरे 33, मिझान सय्यद 11, अंश धूत 11, यांनी धावा काढून थोडासा प्रतिकार केला. केडन्सच्या आर्या जाधवने 23धावात 5 गडी तर, निलय शिंगवीने 30धावात 3 गडी बाद करून संघाला पहिल्या डावात 45 धावांची आघाडी मिळवून दिली. 
 
दुसऱ्या डावात डीव्हीसीएच्या ओंकार राजपूत(3-12), रोहित चौधरी(3-9), अॅलन रॉड्रिग्स(2-16), मनोज यादव(2-36) यांनी सुरेख गोलंदाजी करत केडन्स संघाला 46 षटकात सर्वबाद 98 धावावर रोखले. यात हृषिकेश मोटकर नाबाद 28, आर्या जाधव 22 यांनी धावा केल्या. विजयासाठी 144 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या डीव्हीसीए संघाला दिवसअखेर 19.4 षटकात 9बाद 89धावाच करता आल्या. यात मिझान सय्यद 21, अंश धूत 21, रोहित चौधरी 15, किरण मोरे 11 यांनी थोडासा प्रतिकार केला. केडन्स सिद्धेश वरघंटे(5-22), निलय शिंगवी(1-20)यांनी अचूक गोलंदाजी केली. सामना अनिर्णित राहिल्यामुळे कॅडन्सने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर डीव्हीसीए संघावर विजय मिळवला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
डीव्हीसीए मैदान: पहिला डाव:  केडन्स: 43.1 षटकात सर्वबाद 151धावा वि. डीव्हीसीए: 38षटकात सर्वबाद 106धावा(किरण मोरे 33(67,4×4,1×6), मिझान सय्यद 11, अंश धूत 11, आर्या जाधव 5-23, निलय शिंगवी 3-30);  केडन्स संघाने पहिल्या डावात 45 धावांची आघाडी; 
 
दुसरा डाव: केडन्स: 46 षटकात सर्वबाद 98 धावा(हृषिकेश मोटकर नाबाद 28, आर्या जाधव 22, ओंकार राजपूत 3-12, रोहित चौधरी 3-9, अॅलन रॉड्रिग्स 2-16, मनोज यादव 2-36) वि.डीव्हीसीए:19.4 षटकात 9बाद 89धावा(मिझान सय्यद 21, अंश धूत 21, रोहित चौधरी 15, किरण मोरे 11, सिद्धेश वरघंटे(5-22), निलय शिंगवी(1-20); सामना अनिर्णित; कॅडन्सने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी.
 
पुढील सामने(13 व 14 डिसेंबर 2022):
डेक्कन जिमखाना विरुद्ध स्टार क्रिकेट क्लब, पीआयओसी हडपसर;
युनायटेड स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पीबीकेजीसीए, डिझायर, लोणी;
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी विरुद्ध अँबिशियस क्रिकेट क्लब, व्हेरॉक मैदान;
क्लब ऑफ महाराष्ट्र विरुद्ध पुना क्लब, पुना क्लब मैदान.