October 19, 2025

पीवायसी – पिनॅकल फाऊंडेशन आणि एसबीए कप पुरस्कृत योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षाखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिद्धी जगदाळे, अर्णव पळशीकर यांचे सनसनाटी विजय

पुणे, 23 जुलै 2025: सुधांशु बॅडमिंटन अकादमी यांच्या वतीने व रोहित ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित पीवायसी – पिनॅकल फाऊंडेशन आणि एसबीए कप पुरस्कृत योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षाखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिद्धी जगदाळे, अर्णव पळशीकर यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत पुण्याच्या बिगरमानांकीत सिद्धी जगदाळे हिने अव्वल मानांकित नागपूरच्या शौर्य मडवीचा 15-00, 15-02 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. वाशिमच्या सिद्धी गावंडेने पुण्याच्या शताक्षी देशपांडेचा 15-12, 15-10 असा तर, अनन्या राणे हिने रिया चोपडाचा 15-12, 16-14 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुण्याच्या आयुषी मुंडेने आपली शहर सहकारी मनस्वी गाडेला 15-06, 15-13 असे पराभूत केले.

17 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत बिगरमानांकीत नागपूरच्या अर्णव पळशीकरने पुण्याच्या सहाव्या मानांकित ओजस जोशीचा 08-15, 17-15, 15-10 असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सांगलीच्या ओम सुतारने पुण्याच्या चिरायू नारकरचा 15-13, 13-15, 15-09 असा कडवा प्रतिकार केला. पालघरच्या ऋतुराज चिपटने पुण्याच्या श्रेय भाटियाचे आव्हान 15-02, 15-04 असे मोडीत काढले. कोल्हापूरच्या पुष्कर खोत याने पुण्याच्या सुधन्वा कुलकर्णीवर 15-08, 15-08 असा विजय मिळवला. पाचव्या मानांकित हर्षित माहिमकरने निकुंज अग्रवालचा 15-09, 15-08 असा पराभव करून पुढच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.

निकाल: 15 वर्षांखालील मुले: दुसरी फेरी:
विश्वजीत थविल[1](नाशिक)वि.वि.समीहन देशपांडे(पुणे) 17-15, 15-09;
श्लोक भोसले (सातारा)वि.वि.पार्थिव बिरादार (ठाणे) 16-14, 15-12;
झीशान खान(नागपूर)वि.वि.सिद्धार्थ सामंत (पुणे) 15-07, 15-05;
सौरिश काणे(पुणे)वि.वि.सम्यक मांगुडकर(पुणे) 15-11, 15-11;
चंद्रांशु गुंडले(ठाणे)वि.वि.विराज पेटकर (अहिल्यानगर) 15-08, 15-08;
अनय एकबोटे(पुणे)वि.वि.रुद्र सोनवणे (पुणे) 15-07, 15-05;
शर्विल टेंबुलकर (मुंबई उपनगर)वि.वि.स्वराज सावंत (संभाजीनगर) 15-10, 15-04;

17 वर्षांखालील मुले: पहिली फेरी:
ऋत्व सजवान[1](नागपूर)वि.वि.अक्षत रायसुराना 15-05, 15-09;
सलील मणेरी(पुणे)वि.वि.अमन कुमार (मुंबई शहर) 15-06, 15-12;
एल अभिग्यान सिंह (पुणे)वि.वि.श्लोक बांगड(अहिल्यानगर) 15-05, 15-08;
पुण्यश्लोक राउत्रे (ठाणे)वि.वि.अभव सिन्हा (पुणे) 15-07, 15-02;
अद्वैत कर्नाटकी (ठाणे)वि.वि.रुद्र सोनवणे (पुणे)15-06, 15-08;
समर्थ पाटील (लातूर)वि.वि.विदित भाटी (पुणे) 14-16, 15-09, 15-10;
आदित्य येऊल (नागपूर)वि.वि.वरद माहोकर (पुणे) 15-02, 15-03;
यश मोरे(परभणी)वि.वि.ऋषिकेश राणा(अहिल्यानगर) 15-07, 15-07;
नितीन एस (पुणे)वि.वि.राज मुंडे (बीड) 15-05, 15-01;
अवधूत कदम[4](पुणे)वि.वि.विक्रांत नेगी 15-04, 15-08;
ओम सुतार (सांगली)वि.वि.चिरायू नारकर (पुणे) 15-13, 13-15, 15-09;
ऋतुराज चिपट(पालघर)वि.वि.श्रेय भाटिया (पुणे) 15-02, 15-04;
पुष्कर खोत (कोल्हापूर)वि.वि.सुधन्वा कुलकर्णी (पुणे) 15-08, 15-08;
हर्षित माहिमकर[5]वि.वि.निकुंज अग्रवाल(पुणे)15-09, 15-08;
अर्णव पळशीकर (नागपूर)वि.वि.ओजस जोशी[6](पुणे) 08-15, 17-15, 15-10;

17 वर्षांखालील मुली: पहिली फेरी:
सिद्धी जगदाळे(पुणे)वि.वि.शौर्य मडवी[1](नागपूर) 15-00, 15-02
सिद्धी गावंडे (वाशिम)वि.वि.शताक्षी देशपांडे (पुणे) 15-12, 15-10;
अनन्या राणे वि.वि.रिया चोपडा(पुणे) 15-12, 16-14;
आयुषी मुंडे (पुणे)वि.वि.मनस्वी गाडे (पुणे) 15-06, 15-13;
सई आगवणे (पुणे)वि.वि.श्रव्या दरेकर (संभाजीनगर) 15-09, 15-07;
श्रीजा वानखेडे (नागपूर)वि.वि.टियान कॅस्टेलिनो (मुंबई उपनगर) 15-08, 16-18, 15-12;
लाभा मराठे (पुणे)वि.वि.रेवा वायाळ (मुंबई शहर) 15-01, 15-09;
वृद्धी बंग(वर्धा)वि.वि.सई माने(नांदेड) 15-12, 13-15, 15-10;
अप्रुवा घोळवे (पुणे)वि.वि.प्रिशा शहा (पालघर) 15-10, 15-03;
दक्षिणी पाटील (कोल्हापूर)वि.वि. दर्शना माळी (पुणे) 15-04, 15-03;
मनस्वी चौहान (ठाणे)वि.वि.कायरा निझवान (पुणे) 15-04, 15-13;