पुणे, 12 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटना व एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या तर्फे आयोजित दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत रेल्वे वॉरियर्स संघाने जीएसटी जायंटस संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना जीएसटी जायंटस संघाने 10 षटकात 6बाद 83धावा केल्या. यात रोहन मारवाहने 27चेंडूत 4चौकार व 2षटकाराच्या मदतीने 48 धावा, मोहसिन खानने नाबाद 16 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. रेल्वे वॉरियर्स संघाकडून नाहिद शेख(3-16), विश्वनाथ मुंढे(1-20), हर्षल कगडे(1-13) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान रेल्वे वॉरियर्स संघाने 8षटकात 4बाद 84धावा करून पुर्ण केले. यात युवराज गोळे 21, नाहिद शेख 20, राजेश 19, दिनेश तित्रे 13 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या रेल्वे वॉरियर्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मॅजेस्टिक ग्रुपचे संचालक सौरभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अध्यक्ष रणजीत मोरे, सचिव सुधीर कुलकर्णी, महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचा कर्णधार व माजी रणजीपटू रणजित खिरीड, एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संचालक अनिकेत सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी:
जीएसटी जायंटस:10 षटकात 6बाद 83धावा(रोहन मारवाह 48(27,4×4,2×6), मोहसिन खान नाबाद 16, नाहिद शेख 3-16, विश्वनाथ मुंढे 1-20, हर्षल कगडे 1-13) पराभुत वि.रेल्वे वॉरियर्स: 8षटकात 4बाद 84धावा(युवराज गोळे 21(16,2×4,1×6), नाहिद शेख 20, राजेश 19(6,3×6), दिनेश तित्रे 13, सचिन 2-11)
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: युवराज गोळे (47धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: विश्वनाथ मुंढे (5विकेट);
मालिकावीर: रोहन मारवाह(170धावा व 4विकेट).

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश