लग्नाच्या आमिषाने शिक्षीकेवर बलात्कार, शिक्षकाला अटक

पुणे, दि. २ जून २०२१: शहरातील एका प्रसिध्द शिक्षण संस्थेत काम करताना शिक्षीकेल प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाNया शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने शिक्षीकेकडून कर्ज फेडण्यासाठी ५ लाख घेऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे . विनोद क्षीरसागर असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय शिक्षिकेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही शिक्षक असून दोघेही एका नामांकित शिक्षण संस्थेत नोकरी करतात. आरोपी विनोदनेने फिर्यादी तरूणीला प्रेम जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर तिला ११ लाख रूपयांची मागणी करून ५ लाख रूपये बॅकेचे कर्ज फेडण्यासाठी घेऊन तिची फसवणूक केली. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.