पुणे, 17 सप्टेंबर 2025: रोटरी क्लब ऑफ पिंपळे सौदागर यांच्या वतीने रामा ग्रुप यांच्या संलग्नतेने आयोजित रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत रावी कदम, मौसम माने पाटील, शौर्यतेजा पवार, आरुष सापले, अवनीश बांगर यांनी दोन गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, अगस्त्य तितार, वेदांत मोरे, काशवी सिंग, दिविक गर्ग, सनाया निर्मल, अनय एकबोटे, ईशान लागू,सफा शेख यांनी एकेरीत विजेतेपद पटकावले.
एसीई अरेना स्पोर्ट्स लँड आहेर नगर वाल्हेकर वाडी चिंचवड व ग्रॅव्हिटी पुनावळे या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत 9 वर्षांखालील मुलांच्या गटात अगस्त्य तितारने विवान बर्नवालचा 15-07, 15-12 असा तर, मुलींच्या गटात रावी कदमने हर्षाली भाबडचा 15-05, 15-09 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 11 वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित वेदांत मोरेने चौथ्या मानांकित सिद्धांत धामाचा 15-03, 15-11 असा तर, मुलींच्या गटात काशवी सिंगने अन्वी कुलकर्णीचा 15-04, 15-06 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
13वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित दिविक गर्गने अद्वैत फेरेचा 12-15, 15-12, 15-06 असा कडवा प्रतिकार करत विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित सनाया निर्मलने चौथ्या मानांकित शौर्यतेजा पवारचा 10-15, 16-14, 15-08 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित अनय एकबोटेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत आठव्या मानांकित आरुष सापलेचा 15-09, 15-08 असा पराभव करून विजेतेपद [पटकावले. मुलींच्या गटात मौसम माने पाटील हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित अनन्या बोंद्रेचा 15-08, 12-15, 15-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित ईशान लागूने अव्वल मानांकित अनय एकबोटेचा 16-14, 15-07 असा सनसनाटी पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. याच मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित सफा शेखने पूर्वा मुंडलेचा 15-09, 17-15 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
दुहेरीत अंतिम लढतीत 13 वर्षांखालील मुलींच्या गटात सनाया निर्मल व शौर्यतेजा पवार यांनी अधिश्री क्षीरसागर व मृणाली बडगुजरचा 15-05, 15-07 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मिश्र दुहेरीत प्रथमेश जगदाळे व शौर्यतेजा पवार यांनी अद्वैत फेरे व पूर्वा हांडे यांचा 15-13, 15-09 असा पराभव केला.
निकाल: अंतिम फेरी:
9 वर्षांखालील मुले: अगस्त्य तितार वि.वि.विवान बर्नवाल 15-07, 15-12;
9 वर्षांखालील मुली: रावी कदम वि.वि.हर्षाली भाबड 15-05, 15-09;
11 वर्षांखालील मुले: वेदांत मोरे[2] वि.वि.सिद्धांत धमा[4] 15-03, 15-11;
11 वर्षांखालील मुली: काशवी सिंग वि.वि.अन्वी कुलकर्णी 15-04, 15-06;
13वर्षांखालील मुले: दिविक गर्ग[2] वि.वि.अद्वैत फेरे 12-15, 15-12, 15-06;
13 वर्षांखालील मुली: सनाया निर्मल[3] वि.वि.शौर्यतेजा पवार[4] 10-15,
16-14, 15-08;
15 वर्षांखालील मुले: अनय एकबोटे[1] वि.वि.आरुष सापले[8] 15-09, 15-08;
15 वर्षांखालील मुली: मौसम माने पाटील वि.वि.अनन्या बोंद्रे[3] 15-08,
12-15, 15-10;
17 वर्षांखालील मुले: ईशान लागू वि.वि.अनय एकबोटे[1] 16-14, 15-07;
17 वर्षांखालील मुली: सफा शेख[3] वि.वि.पूर्वा मुंडले 15-09, 17-15.
दुहेरी:
11 वर्षांखालील मुले: कबीर कुलकर्णी/वेदांत मोरे वि.वि.अर्जुन
चॅटर्जी/सिद्धांत धामा 15-05, 15-09;
11 वर्षांखालील मुली: चैत्र झाले/रावी कदम वि.वि.गुंजन घाडगे/प्रशस्ती
बुदुख 15-09, 15-10;
13 वर्षांखालील मुले: कृष्णा पांद्रवदा/शार्विन मगर वि.वि.अव्यक्त
बेंगेरी/शिवेन लांबा 10-15, 17-15, 15-13;
13 वर्षांखालील मुली: सनाया निर्मल/शौर्यतेजा पवार वि.वि.अधिश्री
क्षीरसागर/मृणाली बडगुजर 15-05, 15-07;
मिश्र दुहेरी: प्रथमेश जगदाळे/शौर्यतेजा पवार वि.वि.अद्वैत फेरे/पूर्वा
हांडे 15-13, 15-09;
15 वर्षांखालील मुले: आरुष सापले/अर्णव राणे[2] वि.वि.आर्यन नागवडे/रेयश
चौधरी 15-10, 15-10;
15 वर्षांखालील मुली: मौसम मानेपाटील/शिवांजली कर्डिले वि.वि.ॲलिसन
जोसेफ/रितीशा धुमाळ 15-07, 15-03;
मिक्स दुहेरी: आरुष सापले/शिवांजली कर्डिले वि.वि.नील चव्हाण/ऋषिका रसाळ
15-09, 15-08;
17 वर्षांखालील मुले: अवनीश बांगर/आयांश यारागट्टी वि.वि.अन्वय
समग/विघ्नेश सुतार 15-10, 15-11;
17 वर्षांखालील मुली: लारण्या नलावडे/परिधी बुधवार वि.वि.मनस्वी
गाडे/श्रावणी आर्डे 15-09, 15-08;
मिश्र दुहेरी: अवनीश बांगर/सानिका बगळे वि.वि. प्रशिक तडवळकर/श्रावणी
आर्डे 15-09, 15-12;
More Stories
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय
रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मौसम मानेपाटील, श्रावणी आर्डे, निरंजन मंत्री, असीम श्रोत्रिया, अवनीश बांगर यांचा सनसनाटी विजय