October 27, 2025

वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांचा ‘ग्रीन क्रुसेडर पुरस्कारा’ने सन्मान

पुणे, २३/१२/२०२४ – जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरणाच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल दरवर्षी ग्रीन क्रुसेडर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्योजक नारायण मूर्ती यांच्या हस्ते रवींद्र धारिया यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, माधव गोखले, प्रदीप भार्गव, गणेश नटराजन, जे. पी. श्रॉफ आणि मा. खा. वंदनाताई चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र धारिया यांच्या वतीने वनराई संस्थेचे विश्वस्त सागर धारिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.