September 12, 2025

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयालाची मान्यता धोक्यात, नॅशनल मेडिकल कमिशनची कारणे दाखवा नोटीस

पुणे, २० मे २०२५ : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला वेंâद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनने पत्र पाठवुन त्रुटीची पुर्तता न केल्यास मान्यता रदद का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे . या महाविघालयाला १ कोटी रूपयांचा दंड का करू नये असा सवालही उपस्थित केला आहे. गेल्या चार वर्षात या महाविघालयामध्ये पुरेसे प्राध्यापक नाही. फॉरेन्सेक विभाग नाही. विधाथ्यासाठी वसतिगृह नाही. या सर्व त्रुटीवर नॅशनल मेडिकल कमिशनने बोट ठेवले आहे. त्यामुळे पायाभुत सुविधा नसताना पुणे महापालिकेचे वैघकीय महाविघालय सुरू करण्यात आले अशी टिका माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केली आहे. या वैघकीय महाविघालयातील सर्व त्रुटी प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आता दुर केल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही धेंडे यांनी दिला आहे.

पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाल सुरू करण्यात आले. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार होते. त्यावेळी नॅशनल मेडिकल कमिशनने या महाविघालयाला मान्यता दिल्यानंतर सर्व बाबीची पुर्तता करण्यात येईल् असे सांगितले होते. पण अदयापही या वैघकीय महाविघालयाला प्राध्यापक पुरेशा प्रमाणात नाही. या महाविघालयामध्ये जे प्राध्यापक आहेत. त्यांनी कमला नेहरू रूग्णालयात काम करणे अपेक्षित आहे. पण ते करत नाही. याबाबत तक्रारी करूनही या महाविघालयाचे अधिष्ठाता काहीही कारवाई करत नाही. या महाविघालयाला फॉरेन्सेक विभाग नाही. त्यामुळे या महाविघालयातील विधाथ्योना पिपंरी चिंचवड येथे पाठविले जात आहे. या महाविघालयातील आकृतीबंधाची अमंलबजावणी करण्यात आलेली नाही. या वैघकीय विघालयात पहिल्यांदा प्रवेश घेतलेले विघार्थी आता शेवटच्या वर्षात आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयालाची मान्यता रदद केल्यास विघाथ्याचे नुकसान होउ शकते. त्यामुळे महाविघालयातील सर्व त्रुटी पालिका प्रशासानाने तातडीने दुर कराव्यात अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केली आहे.