पुणे, दि.३१:- सैन्य भरती मुख्यालय, पुणे विभाग पुणे यांच्याद्वारा सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2021 या कालावधी मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणु महामारीच्या सद्याच्या परिस्थिती पहाता सदर सैन्य भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे सैन्य भरती मुख्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे. सैन्य भरती मेळाव्याची पुढील तारीख नंतर कळविली जाईल. तरी जिल्हयातील संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि.), यांनी केले आहे.
More Stories
पुणे: लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांची शिवनेरी ब्रिगेडला भेट
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची दक्षिण कमांडला भेट
लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली