पुणे, २९/०१/२०२५: महाराष्ट्र मोटार वाहन विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियान २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कालावधीतील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियानाचे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटार वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता शुक्रवार ३१ जानेवारी हा दिनांक आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने शनिवार ८ फेब्रुवारी रोजी निरीक्षणाकरीता सादर करावीत.
शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीकरीता ३१ जानेवारी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्यांच्या वेळेमध्ये अंशतः बदल करुन शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे पुर्नवेळापत्रक ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यावी व त्यानुसार वाहन योग्यता प्रमाणपत्र आणि शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीबाबतसाठी उपस्थित रहावे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर