पुणे, १६/१२/२०२२: नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली. मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून रितेश कुमार यांनी पदभार स्विकारला.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची गृहविभागाने पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार स्विकारला. गुप्ता यांची गृहविभागाने राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली.
रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचे आव्हान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार शनिवारी (१७ डिसेंबर) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपासाबाबतची माहिती ते घेणार आहेत.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू