पीएमपीएमएल कडून ग्रामीण भागातील मार्ग दिनांक ७ डिसेंबर २०२२ पासून पूर्ववत सुरू

पुणे , 06 डिसेंबर 2022: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.कडुन पी.एम.आर.डी.ए. क्षेत्रातील ग्रामीण भागातील मार्गांपैकी दोन टप्प्यात ११  बस मार्ग दि. २६/११/२०२२ पासून अ. क्र. १ ते ११ हे बस मार्ग व दि. ०३/१२/२०२२ पासून अ. क्र. १२ ते २३ हे बस मार्ग असे एकूण २३ बस मार्ग बंद करण्यात आलेले होते. सदरच्या मार्गांवर प्राप्त होणारे उत्पन्न व येणारा खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने सदरचे बस मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तथापि, प्रवाशांच्या मागणीनुसार या मार्गावरील बससेवा दिनांक ०७/१२/२०२२ पासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहे.

पूर्ववत सुरु होणाऱ्या बस मार्गांचा तपशील खालीलप्रमाणे

.क्र. मार्ग क्र. पासून पर्यंत नियोजित शेडयुल खेपा डेपो वारंवारीता
सकाळ दुपार
२३१ स्वारगेट काशिंगगांव स्वारगेट ४ तास
२३२ स्वारगेट बेलावडे स्वारगेट ४ तास
२९३ कात्रज सर्पोद्यान सासवड १४ कात्रज २ तास
२९६ कात्रज सर्पोद्यान विंझर २० कात्रज १ तास ४५ मि.
२११ सासवड उरूळी कांचन २८ हडपसर १ तास ३० मि.
२१२ हडपसर मोरगांव हडपसर ४तास
२१० हडपसर जेजुरी हडपसर ४ तास
२२७ अ बी.आर.टी. मार्केट यार्ड खारावडे/लव्हार्डे २० मार्केटयार्ड १ तास १५ मि.
१३७ बी.आर.टी. वाघोली राहुगांव, सालु मालू २२ पुणे स्टेशन १ तास ३० मि.
१० ३५३ चाकण, आंबेठाण चौक शिक्रापुर फाटा ४० भोसरी ३५ मि.
११ २२० सासवड यवत ११ शेवाळवाडी ३ तास
१२ ७४ हिंजवडी शिवाजी चौक घोटावडे फाटा ४५ बालेवाडी ३५ मि.
१३ ८६ पुणे स्टेशन पौंड एस.टी.स्टॅण्ड २२ पुणे स्टेशन १ तास १५ मि.
१४ १०६ एनडीए गेट नं.१० सिम्बायोसिस नर्सिंग सुसगांव ३२ कोथरूड १ तास
१५ १३५ बी.आर.टी. वाघोली रांजणगांव सांडस पुणे स्टेशन ४ तास ३० मि.
१६ १५७ भेकराईनगर तळेगांव ढमढेरे १६ हडपसर १ तास १५ मि.
१७ १५९ ब बी.आर.टी. शिक्रापुर एस.टी.स्टॅण्ड लोणी धामणी १४ न.ता.वाडी २ तास
१८ १६४ बी.आर.टी. शिक्रापुर एस.टी.स्टॅण्ड न्हावरे २० पुणे स्टेशन २ तास
१९ १८४ हडपसर लोणी काळभोर रामदरा १६ हडपसर १ तास ४५ मि.
२० २२८ कात्रज वडगांव मावळ २४ कात्रज ५५ मि.
२२८ कात्रज वडगांव मावळ १८ बालेवाडी ५५ मि.
२१ २६४ भोसरी पाबळगांव भोसरी ३ तास ३० मि.
२२ ३१६ चिंचवडगांव खांबोली (कातरखडक) पिंपरी ३ तास
२३ ३६८ निगडी लोणावळा रेल्वे स्टेशन ५२ निगडी ४० मि.
एकूण ५३ ५२ ४६४

सदर बस मार्ग सुरु होत असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.