कोंढव्यात पादचारी तरूणाला लुटले

पुणे, ३१ मे २०२१: रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटल्याची घटना दोन दिवसांपुर्वी कोंढव्यातील मीठानगरमध्ये घडली. याप्रकरणी तीन चोरट्यांविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश बाबासाहेब सोनवणे (वय १९, रा. गुलटेकडी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा दहाच्या सुमारास यश कोंढव्यातील मीठानगरमधून रस्त्याने पायी चालला होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्याच्याकडून फोन लावण्यासाठी मोबाईल घेतला. त्यानंतर यशने त्यांना मोबाइल परत मागितला असता, चोरट्यांनी शिवनेरीनगरमध्ये जाउन फोन करायचा आहे, असे सांगत त्याला दुचाकीवर बसविले. त्यानंतर थोड्या अंतरावर जाउन चोरट्यांनी यशला मोबाईल देणार नसल्याचे सांगून पळ काढला. याप्रकरणी कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.