रोटरीकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास १५ संगणक व १० प्रिंटर्स भेट

पिंपरी, २०/०८/२०२१:- रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने व पोस्को आयपीपीसी कंपनीच्या सीएसआर फंडातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास १५ संगणक आणि १० प्रिंटर्स भेट देण्यात आले.

यावेळी आमदार सुनील शेळके,पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,पोस्को कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक संग ह्येओन किम, पो .उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पो आयुक्त डॉ सागर कवडे,प्रशांत अमृतकर, क्लबचे अध्यक्ष जगमोहन सिंग,सचिव सुहास ढमाले, सेवा संचालक अंकाजी पाटील, पोस्कोच्या नेहा वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.


आमदार शेळके म्हणाले कि, “जनतेची सुरक्षा करता यासाठी आम्ही हातात घालून काम करू.पोलीस बांधव हे समाजासाठी अहोरात्र झटत असतात . त्यांना जी मदत लागेल ती करू.
आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले कि, “शहर आणि मावळ सारखा ग्रामीण भाग पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत येतो.वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कमी आहे.


शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही अहोरात्र झटत असतो. आयुक्तालय हे प्राथमिक स्तरावर असल्याने सुविधांची कमतरता आहे.सामाजिक संस्थाकडून सुविधा मिळाल्यास आम्हाला काम करण्यास हातभार लागेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जगमोहन सिंग यांनी केले. सूत्रसंचालन विजय काळभोर यांनी केले.