पुणे,दि. १४/६/२०२१- शहरातील वानवडी पेट्रोल पंपावरील मॅनेजरकडून ८ लाख ७४ हजाराची रोकड लूटण्यात आल्याची घटना आज दुपारी घडल्याने खळबळ उडाली आहे. मॅनेजर दुचाकीवर रोकड बॅंकेत जमा करण्यासाठी जात असताना, दोघांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवत लुटले आहे. याप्रकरणी बाळासाहेब अंबुरे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बाळासाहेब अंबुरे हे वानवडी येथील पेट्रोलपंपावर मॅनेजर म्हणून काम करतात. शनिवार आणी रविवार दोन दिवसांतील रोकड जमा करण्यासाठी ते आज दुपारी बॅंकेत चालले होते.. काखेत पिशवी लावून दुचाकीवरून जात असताना, दोघांनी गाडी आडवी लावून थांबवले. यानंतर शिवीगाळ करत व कोयता दाखवत त्याच्याकडील रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. आरोपी गाडीवरुन पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणाचा तपास वानवडी पोलीस व गुन्हे शाखा करत आहेत. सय्यदनगर येथे रहाणारे आनंद लाहोली पेट्रोलपंपाचे मालक आहेत.
More Stories
ठाण्याला हरवून पुणे उपांत्य फेरीत
अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय पीडीएफए फुटबॉल
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय