बाऊन्स टेनिस अकादमी-एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत विश्वजीत सणस, साईइती वराडकर यांची दुहेरी मुकुटाकडे वाटचाल

पुणे, 28 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड आणि कासट सारीज रविवार पेठ पुरस्कृत यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाऊन्स टेनिस अकादमी -एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात साईइती वराडकर हिने, तर मुलांच्या गटात विश्वजीत सणस या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
 
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या साईइती वराडकर हिने श्रेया पठारेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या जीडी मेघनाने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित सिया प्रसादेचा 6-4, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत साईइती वराडकर व देवाश्री महाडेश्वर यांनी मृणाल शेळके व ह्रितिका कापले यांचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली.
 
मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या विश्वजीत सणस याने पाचव्या मानांकित अवनीश चाफळेचा 6-3, 1-6, 6-4 असा तर, दक्ष पाटीलने सक्षम भन्साळीचा 6-2, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.दुहेरीत उपांत्य लढतीत विश्वजीत सणस व छनामल यले यांनी सनत कडले व सूर्या काकडे यांचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुली:
साईइती वराडकर(महा)वि.वि.श्रेया पठारे(महा)6-3, 6-2;
जीडी मेघना(कर्नाटक)[2] वि.वि.सिया प्रसादे(महा)[5] 6-4, 7-5;
 
मुले: 
विश्वजीत सणस(महा)[3] वि.वि.अवनीश चाफळे(महा)[5] 6-3, 1-6, 6-4;
दक्ष पाटील(महा)वि.वि.सक्षम भन्साळी(महा)6-2, 6-4; 
 
दुहेरी गट:मुले: उपांत्य फेरी: 
शिवतेज शिरफ़ुले/शार्दूल खवळे[1] वि.वि.अयान शेट्टी/अहान शेट्टी[4] 6-4, 4-6, 10-8;
विश्वजीत सणस/छनामल यले[3]वि.वि.सनत कडले/सूर्या काकडे 6-4, 6-2;
 
मुली:
साईइती वराडकर/देवाश्री महाडेश्वर वि.वि.मृणाल शेळके/ह्रितिका कापले 7-6(1), 6-0;
सिया प्रसादे/देवांशी प्रभुदेसाई वि.वि.आर्या शिंदे/सेरेना रॉड्रिक्स 6-0, 6-4