कथानिक ऑडिओ ऍप’ च्या माध्यमातून सरस्वती’ला नवपालवी; ऍप’द्वारे ‘बालकथानिक २०२१’ या प्रतियोगितेचे आयोजन

पुणे, दि. १२: सोलापूर येथील सरस्वती बुक डेपो व पुण्यातील सरस्वती ग्रंथ भांडार या संस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी ‘कथानिक ऑडिओ ऍप’ सुरू केले आहे. या ऍप’ च्या माध्यमातून ‘बालकथानिक २०२१’ या प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा १२ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे.


याबाबत स्पर्धेचे आयोजक व सरस्वती ग्रंथ भांडार, पुणे चे मयूर कुंदूर व कथानिक’ चे सुनील जोशी म्हणाले,” गेल्या १९ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचा अभ्यास, मित्रमैत्रीणींसोबत संवाद आणि खेळ हे देखील मोबाईलमध्येच होतात. परिणामी मुले काय बघतात यावर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. अशा वेळी मुलांचा अध्यात्मिक आणि कलात्मक विकास यांचा मेळ साधायचा असेल तर वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आम्ही ‘बालकथानिक’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. हि स्पर्धा निःशुल्क असल्याने सर्व मुले यात सहभागी होऊ शकतात.”


यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला आपल्या आवाजात ‘गणपती स्तोत्राचा’ व्हिडिओ रेकॉर्ड करून 9373311007 या क्रमांकावर पाठवायचा आहे. सदर स्पर्धा हि ५ ते ७ वर्षे व ८ ते १० वर्षे या २ वयोगटांमध्ये घेण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकाला सुप्रसिद्ध गायिका योगिता गोडबोले-पाठक यांना भेटण्याची व अमोद कुलकर्णी यांच्या स्टुडियोत कथानिक’च्या पुढच्या ध्वनी-पुस्तकाचे रेकॉर्डिंग करण्याची संधी मिळणार आहे.


स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती कथानिक या ऍप वर दिलेली आहे, असे जोशी यांनी सांगितले.