पुणे, 05 डिसेंबर 2022: कात्रज शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ (जुना कात्रज घाट) कि.मी. १२/०० ते २०/२०० या लांबीत घाट रस्त्याचे डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.
पुणे ते सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतुक सुरु आहे. वाहनधारकांनी साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन बोगद्यातून यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता ब. नि. बहिर यांनी केले आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा