Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: मराठी भाषा पंधरवडा

पुणे,दि.२४/०१/२०२३ – मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे साहित्यिक व भाषिक योगदान या विषयावर मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत ३६ जिल्हे ३६ व्याख्याने होणार असून त्यातील पुण्यातील व्याख्यान दिनांक २५ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. या व्याख्यानादरम्यान प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे हे अध्यक्षीय भाषण करतील. तर मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, भाषा संचालक विजया डोनीकर, विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ.प्रभाकर देसाई उपस्थित राहणार आहेत.