रामटेकडीचे भाई म्हणत बेकरी दुकानदाराला लुटले

पुणे, दि. 07/05/2021: टोळक्याने दुकानदाराला आम्ही रामटेकडीचे भाई आहोत, असे म्हणत त्यांच्याकडील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना दोन दिवसांपुर्वी रामटेकडीतील खुर्शीद दुकानासमोर घडली. याप्रकरणी इलीयास अन्सारी (वय ४०) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लॉकडाउन असल्यामुळे अन्सारी यांनी बेकरी बंद ठेवली होती. मात्र, दोन दिवसांपुर्वी त्यांच्या बेकरीजवळ आलेल्या तिघाजणांनी शटरवर दगडपेâक करीत दुकान उघडायला सांगितले. अन्सारी यांनी दुकान उघडण्यास नकार दिला असता, टोळक्याने त्यांना हाताने मारहाण केली. आम्ही रामटेकडीचे भाई आहोत, दुकान उघड नाहीतर खल्लास करीन अशी धमकी देउन त्यांच्याकडील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर टोळक्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटावडे तपास करीत आहेत.