पुणे, ३०/११/२०२१: ओमायक्राॅन विषाणूच्या धास्तीमुळे मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं शाळा १५ डिसेंबरनंतर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
महापौर मोहोळ आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या
बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट
केलं होतं. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र दिसून आलं होतं. हा संभ्रम दूर करण्यासाठी महापौर मुळे आणि आयुक्त कुमार यांच्या मधील आज भेट झाली महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी या संदर्भात आदेश देखील आज काढले आहेत १५ डिसेंबर रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे व त्याचे स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत असे विक्रम कुमार यांनी आदेशात नमूद केलेले आहे.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन