September 23, 2025

दुसऱ्या मानेग्रो नरेंद्र सोपल मेमोरियल टेनिस क्लब अजिंक्यपद 2023 स्पर्धेत पीवायसी अ, टेनिसनट्स रॉजर यांच्यात अंतिम लढत

पुणे, 5 नोव्हेंबर, 2023: टेनिसनट्स यांच्या वतीने आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या मानेग्रो नरेंद्र सोपल मेमोरियल टेनिस क्लब अजिंक्यपद 2023 स्पर्धेत उपांत्य फेरीत पीवायसी अ व टेनिसनट्स रॉजर या संघांनी अनुक्रमे पीवायसी ब व टेनिसनट्स राफा संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाषाण येथील एनसीएल टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात योगेश पंतसचिव, अनिरुद्ध साठे, अभिषेक ताम्हाणे, अमोघ बेहेरे, पराग नाटेकर, ऋतू कुलकर्णी यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पीवायसी अ संघाने पीवायसी ब संघाचा 18-07 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात टेनिसनट्स रॉजर संघाने टेनिसनट्स राफा संघाचा 17-10 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून संदीप बेलोडी, जॉय बॅनर्जी, नितीन सावंत, आलोक नायर यांनी सुरेख कामगिरी केली.
निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी अ वि.वि.पीवायसी ब 18-07
(90 अधिक गट: योगेश पंतसचिव/अनिरुद्ध साठे वि.वि.अमित लाटे/ध्रुव मैड 6-2; 60 अधिक गट: अभिषेक ताम्हाणे/अमोघ बेहेरे वि.वि.सारंग देवी/संग्राम पाटील 6-3; 80 अधिक गट: पराग नाटेकर/ऋतू कुलकर्णी वि.वि.अमित नाटेकर/तन्मय चोभे 6-2);
टेनिसनट्स रॉजर वि.वि.टेनिसनट्स राफा 17-10(90 अधिक गट: संदीप बेलोडी/जॉय बॅनर्जी वि.वि.चन्ना कुमार/सुधीर पिसाळ 6-0; 60 अधिक गट: नितीन सावंत/आलोक नायर वि.वि.शशांक माने/सलील कुंचूर 6-4;80 अधिक गट: राहुल कोठारी/रवी कोठारी पराभूत वि.सुनील लुल्ला/अतुल करमपूरवाला 5-6(5-7)).