पुणे, 8 फेब्रुवारी, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत इन्फोसिस संघाने दुसरा, तर इन्फी बीयु इलेव्हन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघांनी पहिला विजय नोंदवला.
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात संदीप संघाई(145धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने एन्कोरा संघाचा 96 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इन्फोसिस संघाने 20 षटकात 4बाद 227धावा केल्या. यात संदीप संघाईने अफलातून फलंदाजी करताना 67चेंडूत 17 चौकार व 7 षटकाराच्या मदतीने 145 धावा चोपल्या. त्याला निखिल रोकडे 44 धावा, सुवरोजित साहू नाबाद 14 धावा काढून साथ दिली. याच्या उत्तरात एन्कोरा संघाला 20 षटकात 7बाद 131धावापर्यंतच मजल मारता आली. यात पृथ्वीराज जाधवराव 32, आकाश बिहाडे 27, चिन्मय जोशी 21, प्रसन्ना सावंत नाबाद 26 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. इन्फोसिसकडून हर्षल महाले(2-23), विशाल चेडे(2-23) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 96 धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात ऋषिकेश खांडेकर 61धावा)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इन्फी बीयु इलेव्हन संघाने एफआयएस ग्लोबल संघाचा 8 गडी राखून पराभव केला. विक्रांत बांगर 50 धावांच्या खेळीच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने सिमेन्स संघावर 60 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
निकाल: साखळी फेरी:
इन्फोसिस: 20 षटकात 4बाद 227धावा(संदीप संघाई 145(67,17×4,7×6), निखिल रोकडे 44(34,6×4), सुवरोजित साहू नाबाद 14, प्रसन्ना सावंत 1-12)वि.वि.एन्कोरा: 20 षटकात 7बाद 131धावा(पृथ्वीराज जाधवराव 32(27,6×4), आकाश बिहाडे 27, चिन्मय जोशी 21, प्रसन्ना सावंत नाबाद 26, हर्षल महाले 2-23, विशाल चेडे 2-23); सामनावीर – संदीप संघाई; इन्फोसिस संघ 96 धावांनी विजयी;
एफआयएस ग्लोबल: 20 षटकात 8बाद 123धावा(मृदुल म्हात्रे 38(33,5×4,1×6), प्रशांत पोळ 17, समीर कुदळे 3-17, सौरभ थोरात 1-17) पराभुत वि.इन्फी बीयु इलेव्हन: 11.3 षटकात 2बाद 124धावा(ऋषिकेश खांडेकर 61(29,11×4,1×6), विशाल भैरमडगीकर 30(20,4×4), सौरभ थोरात नाबाद 14, निखिल भुजबळ 2-20); सामनावीर-ऋषिकेश खांडेकर; इन्फी बीयु इलेव्हन संघ 8 गडी राखून विजयी;
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 20षटकात 4बाद 172धावा(साईनाथ शिंदे नाबाद 69 (47,3×4,3×6), विक्रांत बांगर 50 (31,6×4,2×6), पूरब गजिंकर नाबाद 13, गौतम 2-24)वि.वि. सिमेन्स: 20 षटकात सर्वबाद 112धावा(अमित कुलकर्णी 31(21,7×4), पारस बजाज 10, सागर दुबे 2-25, दीपक शर्मा 2-8); सामनावीर-विक्रांत बांगर; टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघ 60 धावांनी विजयी.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय