September 24, 2025

दहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत कपिला परमार ऑल स्टार्स संघाचा दुसरा विजय

पुणे, 14 फेब्रुवारी 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत साखळी फेरीत कपिला परमार ऑल स्टार्स संघाने दुसरा विजय मिळवला.

पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सुमेध गांगल (नाबाद 41धावा व 1-10) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जीएम टायफून्स संघाने व्हीके टायगर्स संघाचा 27 धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात प्रकाश कारिया 33 धावांच्या खेळीच्या जोरावर कपिला परमार ऑल स्टार्स संघाने फोर ओक्स सेलर्स संघाचा 4धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. मनप्रीत उप्पल नाबाद 25 धावांच्या जोरावर पृथ्वी लायन्स संघाने व्हीएनएन वुल्व्हस संघाचा 7गडी राखुन पराभव केला. करण शर्मा 35धावा) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर तलब टायटन्स संघाने क्वालिटी वॉरियर्स संघाचा 20धावांनी पराभव करून विजय नोंदवला.

अन्य लढतीत आधिश शहा 38 धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्स संघाने जेटस संघाचा 7 गडी राखून पराभव करून पहिला विजय मिळवला.

निकाल: साखळी फेरी:
जीएम टायफून्स: 6 षटकात 2बाद 86धावा(सुमेध गांगल नाबाद 41(15,3×4,3×6), क्रिश शहा 21, अश्विन शहा 18, किरण देशमुख 1-7)वि.वि.व्हीके टायगर्स: 6 षटकात 4बाद 59धावा(विक्रम काकडे 23, राजेश बनसोडे 21, पवन कटारिया 1-4, सुमेध गांगल 1-10);सामनावीर – सुमेध गांगल; जीएम टायफून्स संघ 27 धावांनी विजयी;

कपिला परमार ऑल स्टार्स: 6षटकात 3बाद 78धावा(प्रकाश कारिया 33(15,3×4,2×6), सर्वेश मुथा 19, ऋषभ कपूर नाबाद 19, सुमिरन मेहता 1-6)वि.वि.फोर ओक्स सेलर्स: 6षटकात 2बाद 74धावा(रौनक ढोले पाटील नाबाद 45(21,5×6), सुमिरन मेहता 15, हिरेन परमार 1-15);सामनावीर – प्रकाश कारिया; परमार ऑल स्टार्स संघ 4 धावांनी विजयी;

व्हीएनएन वुल्व्हस: 6 षटकात 3बाद 60धावा(अकीलक पूनावाला 24(11,2×4,1×6), अभिषेक दळवी नाबाद 22(15,2×4), रजत श्रॉफ 1-8) पराभुत वि.पृथ्वी लायन्स: 5.2 षटकांत 2 बाद 61धावा(मनप्रीत उप्पल नाबाद 25(13,1×4,1×6), वरुण 18, खालिद परवानी नाबाद 14, वरुण तेलंग 1-6); सामनावीर – मनप्रीत उप्पल; पृथ्वी लायन्स संघ 7 गडी राखून विजयी;

तलब टायटन्स: 6 षटकात 4बाद 76धावा(करण शर्मा 35(15,5×4,2×6), ऋषभ बजाज 24(8×4,2×6), चिराग परमार 1-11) वि.वि.क्वालिटी वॉरियर्स: 6 षटकात 4बाद 56धावा(संदीप अभिचंदानी 29(18,4×4), झियान तालब 23(12,2×4,1×6), वीर मक्कर 2-2); सामनावीर – करण शर्मा; तलब टायटन्स संघ 20 धावांनी विजयी;

जेटस: 6षटकात 1बाद 74धावा(चिराग लुल्ला नाबाद 44(19,6×4,1×6), पुनीत सामंत 15, मल्ली अर्जून नाबाद 12, अर्जून मोटाडू 1-8) पराभुत वि. किंग्स: 5.5षटकात 1बाद 75धावा(आधिश शहा 38(17,5×4,1×6), अमन पारेख नाबाद 31(18,3×4,1×6), शरण सिंग 1-7); सामनावीर – आधिश शहा; किंग्स संघ 7 गडी राखून विजयी;