September 23, 2025

दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत मनिषा रॉयल्स संघाचा दुसरा विजय

पुणे, 12 सप्टेंबर, 2023: पुना क्लब लिमिटेड आयोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत गटसाखळी फेरीत मनिषा रॉयल्स संघाने सलग दुसरा विजय नोंदवला.

पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात अंगद सहानी, मिनू करकरिया, रोहींगटन इराणी,आरके शर्मा, कुणाल वासवानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मनिषा रॉयल्स संघाने आरएस कॅनन्स संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून दुसरा विजय मिळवला.

ब गटात रॉकेट्स संघाने रॅक रायडर्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सुरुवात केली. रॉकेट्स संघाकडून महाराष्ट्राचा क्र. ५ खेळाडू सूरज राठी, कपिल पंजाबी,वैभव शहा रोहित चोप्रा यांनी सुरेख कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अन्य लढतीत द व्हर्लविंड्स संघाने बॉल ब्रेकर्स संघावर 4-1 असा विजय मिळवत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
ब गट: रॉकेट्स वि.वि. रॅक रायडर्स 3-2(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: सूरज राठीवि.वि.मुनीझ पूनावाला 73-24; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: वैभव शहा/रोहित चोप्रा पराभुत वि.आशिष पटेल/अनिकेत संघवी 76-87; हॅंडिकॅप बिलियर्ड्स 200पॉईंट्स: कपिल पंजाबीवि.वि.रमेश केरिंग 200-121; 6रेड हॅंडिकॅप स्नूकर: राहुल बग्गा पराभुत वि.अयान खान37-46, 48-47; ब्लु शॉट:सुरज राठी/वैभव शहा/रोहित चोप्रा/राहुल बग्गा/कपिल पंजाबी वि.वि.मुनीझ पुनावाला/आशिष पटेल/अनिकेत संघवी/अयान खान/रमेश केरिंग 4-2);

ब गट: द व्हर्लविंड्स वि.वि.बॉल ब्रेकर्स 4-1(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: विघ्नेश संघवी वि.वि.विनोद माखिजा 83-65; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: साहिल हांडा/कपिल सामंत वि.वि.टोनी शेट्टी/रणजीत पांडे 78-59; हँडिकॅप बिलियर्डस 200 पॉईंट्स: सुनील आशेर वि.वि.अंकित दामले 200-150; 6रेड हॅंडिकॅप स्नूकर: रुसी मरोलिया पराभुत वि.प्रशांत राजघरिया 33-56, 57-38, 48-55; ब्लू शॉट: विघ्नेश संघवी/साहिल हांडा/कपिल सामंत/कार्तिक नागरानी/सुनील आशेर वि.वि.टोनी शेट्टी/अंकित दामले/प्रशांत राजघारिया/रणजित पांडे/राजीव नागराणी 4-2);

अ गट: मनीषा रॉयल्स वि.वि.आरएस कॅनन्स 5-0 (15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: अंगद सहानी वि.वि.आनंद केरिंग 78-45; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: मिनू करकरिया/रोहींगटन इराणी वि.वि.रिकी राजपाल/निशांत मेहता 94-50; हँडिकॅप बिलियर्ड्स 200 पॉईंट्स:आरके शर्मा वि.वि.माधव क्षीरसागर 200-185; 6रेड हॅंडिकॅप स्नूकर: कुणाल वासवानी वि.वि.प्रणय माळगावकर 58-56, 62-27; ब्लू शॉट: अंगद सहानी/कुणाल वासवानी/मिनू करकरिया/रोहींगटन इराणी/आरके शर्मा/ वि.वि.रिकी राजपाल/माधव क्षीरसागर/निशांत मेहता/प्रणय माळगावकर/आनंद केरिंग 4-2).