पुणे, 06 फेब्रुवारी 2024: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे आणि स्वयंभू फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, गोखले नगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे मैदान येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ५३८ उमेदवारांची निवड करण्यात आली.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि जिल्ह्यातील विविध महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील ३८ उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. उपस्थित उद्योजकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यामधून ५३८ उमेदवारांची निवड केली. २५३ उमेदवारांनी विविध महामंडळांच्या योजनांची माहिती घेतली.
रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार शिरोळे यांनी केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रास्ताविकात मेळाव्याबाबत माहिती दिली. विविध ठिकाणी घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

More Stories
Pune: एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन
Pune: पुण्यात पुन्हा फ्लेक्स भाषेचा सुळसुळाट प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे: इच्छूकांकडून जुळवा जुळव सुरू तिकिटासाठी; सर्वच पक्षांचा घेतला जातोय अंदाज