पुणे, १८/०२/२०२२: पुण्यातील एल्के केमिकल्स चे संस्थापक डॉ. रविंद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची “ फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअर्स ” या प्रख्यात अमेरिकन संस्थेने सन २०२२ या वर्षासाठी सन्माननीय सदस्य (व्यासंगी अभ्यासक) म्हणून निवड केली आहे. या संस्थेच्या वतीने अभियांत्रिकी संशोधन, सराव किंवा शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या नविन आणि विकसनशील क्षेत्रांमध्ये अग्रेसर आणि अभियांत्रिकीच्या पारंपारिक क्षेत्रात मोठी प्रगती करणार्यांना अकॅडमीचे सन्मानित सदस्यत्व देण्यात येते. जगभरातील २२ सदस्यांपैकी डॉ.रविंद्र कुलकर्णी या प्रज्ञावंत मराठी माणसाची निवड होणे ही निश्वितच आनंददायी , स्फूर्तिदायक व अभिमानास्पद गोष्ट आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअर्स मध्ये निवड होणे हा व्यावसायिक अभियंता म्हणून सर्वोच्य सन्मान आहे.
डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी केलेला नाविन्यपूर्ण उपक्रम, , ग्रीनफिल्ड तंत्रज्ञान विकास ,केंद्रित व्यवसाय , सर्वोच्य व्यावसायिक गुणविशेषत्व,संशोधन, कौशल्यवृध्दी या सर्व विषयांमधिल उत्कृष्ट नेतृत्व आणि विकसनशील क्षेत्रांच्या अग्रगण्य योगदान या निकषांवर त्यांना हे सन्मानित सदस्यत्व देण्यात आले आहे.वॉशिंगटन ,अमेरिका येथे २ ऑक्टोबर २०२२ रोजी हे सदस्यत्व त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. रविंद्र कुलकर्णी हे एल्के केमिकल्स (सिलिकॅान स्पेशलिटी प्रॉडक्टस्) व आर्कलाईट स्पेशालिटी लॅम्प्स या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत.
डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या भागात अमेरिकेतील २० वर्षाच्या वास्तव्यात सिलिकॉन्स, सॉलिड स्टेट केमिस्ट्री आणि कॉ म्प्यूटर हार्डवेअर मधिल सरफेस विज्ञान विकास या सारख्या विविध क्षेत्रात असंख्य पेटंट्स आणि मान्यता मिळवून एक यशस्वी शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. पुढील कारकीर्दीच्या भागात त्यांनी आपले लक्ष एक उद्योजक आणि उद्योगपती या वर केंद्रित करुन एल्के केमिकल्स,सिलिकॉन इंटरनॅशनल प्रॉडक्ट्स आणि आर्कलाईट स्पेशालिटी लॅम्प्स या सारख्या कंपन्या यशस्वीपणे उभारल्या. सामान्य माणसासाठी आधिक परवडणारे आणि वितरीत करण्यासाठी भौतिक तंत्रज्ञान विकसित करण्याची त्यांच्या मध्ये क्षमता आहे. अगदी मागणी असलेल्या अनुप्रयोगांसाठी देखील ८०% च्या कार्बन फूटप्रिंट घटाने, मर्यादित किंवा कोणत्याही वापरासह अक्रिय सिलिकॉन्स उपयुक्त हेतूंमध्ये रूपांतरित करण्याचे तंत्रज्ञान व सिलिकॉन पॉलिमर मधिल शाश्वत सिलिकॉन्सचा विकास आणि यशस्वीपणे व्यापारीकरण अशा विषयांमध्ये त्यांचे योगदान महत्वाचे आहे. भारतासारख्या विकसनशील देशात हे अत्यंत लक्षणीय आहे.
या नामंकना बाबत डॉ. रविंद्र कुलकर्णी म्हणाले “ फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअर्स अमेरिका ” या जगप्रसिध्द संस्थेने माझी निवड सन्माननीय सदस्य म्हणून केल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझे सर्व सहकारी व माझे मार्गदर्शक प्रा.डॉ.सोमासुंदरम यांचाही आहे.
या वर्षीच्या जगभरातील २२ सदस्यांच्या यादीत सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट), एलोन मस्क (टेस्ला) तर भारतातील चंद्रशेखरन ( टाटा सन्सचे अध्यक्ष) शिक्षणतज्ञ पद्मश्री डी.जी.यादव ( आयसीटी, मुंबई) ,सुरेश नागप्पा( इस्रोचे शास्त्रज्ञ) डॉ. रविंद्र कुलकर्णी( एल्के केमिकल्स चे संस्थापक) या सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.तर उर्वरित युके ,जर्मनी,चीन, कोरिया आणि जपान या देशामधिल आहेत. या उत्तुंग सन्माना प्रित्यर्थ डॉ.रविंद्र कुलकर्णी यांचे अभिनंदन.
More Stories
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडू सहभागी
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद