September 20, 2025

रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मौसम मानेपाटील, श्रावणी आर्डे, निरंजन मंत्री, असीम श्रोत्रिया, अवनीश बांगर यांचा सनसनाटी विजय

पुणे, 15 सप्टेंबर 2025: रोटरी क्लब ऑफ पिंपळे सौदागर यांच्या वतीने रामा ग्रुप यांच्या संलग्नतेने आयोजित रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मौसम मानेपाटील, श्रावणी आर्डे, निरंजन मंत्री, असीम श्रोत्रिया, अवनीश बांगर यांनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एसीई अरेना स्पोर्ट्स लँड आहेर नगर वाल्हेकर वाडी चिंचवड व ग्रॅव्हिटी पुनावळे या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित मौसम मानेपाटील हिने चौथ्या मानांकित इशानवी काळेचा 15-4, 15-5 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. श्रावणी आर्डे हिने दुसऱ्या मानांकित शिवांजली कर्डिलेचा 15-12, 15-6 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

19 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित असीम श्रोत्रिया याने अव्वल मानांकित इशान आगाशेचा 15-17, 15-08, 20-18 असा तीन गेममध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अवनीश बांगरने दुसऱ्या मानांकित वत्सल तिवारीचा 15-10, 11-15, 15-12 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. 50 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत निरंजन मंत्रीने दुसऱ्या मानांकित अमित पाटीलचा 15-07, 15-12 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. 35 वर्षांवरील पुरुष गटात अनुप सकलेचाने अव्वल मानांकित सौरभ रायचे आव्हान 21-20, 15-13 असे संपुष्टात आणले. पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित वसीम शेखने अव्वल मानांकित सिद्धेश पालवेवर 15-4, 15-11 असा विजय मिळवला. नरेंद्र पाटील याने चौथ्या मानांकित सुमित भोळेचा 15-09, 12-15, 15-08 असा कडवा प्रतिकार केला.

निकाल: 15 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
अनन्या बोंद्रे[3]वि.वि.निष्ठा भंडारी[5] 15-05, 15-03;
सानिका बगळे[1] वि.वि.ऋषिका रसाळ[6] 15-10, 15-11;
मौसम मानेपाटील वि.वि.इशानवी काळे[4] 15-4, 15-5;
श्रावणी आर्डे वि.वि.शिवांजली कर्डिले[2] 15-12, 15-6;

19 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
असीम श्रोत्रिया[6] वि.वि. इशान आगाशे[1] 15-17, 15-08, 20-18;
ध्रुव समुद्र वि.वि. अमन मिंडा 15-13, 11-15, 15-13;
अनय एकबोटे वि.वि. अर्णव बाफना 16-14, 15-11;
अवनीश बांगर वि.वि. वत्सल तिवारी[2] 15-10, 11-15, 15-12;

पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
वसीम शेख[7] वि.वि.सिद्धेश पालवे[1] 15-4, 15-11;
गणेश सपकाळ वि.वि.श्रेयस लागू 15-6, 15-7;
नरेंद्र पाटील वि.वि.सुमित भोळे[4] 15-09, 12-15, 15-08;

35 वर्षांवरील पुरुष : उपांत्यपूर्व फेरी:
अनुप सकलेचा वि.वि.सौरभ राय[1] 21-20, 15-13;
ओंकार केळकर वि.वि.सुनील जैस्वाल 16-14, 15-11;
नवीन कुमार वि.वि.साईकिरण एला 15-4, 15-8;

40 वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
आमोद आठवले[1] वि.वि. यतिन तापकीर 15-12, 16-14;
दर्पण महेशगौरी वि.वि.मनोज हसनी 15-11, 15-13;
दिव्यचंद्र सूर्यवंशी वि.वि.अमित पारवेकर 15-07, 15-11;
जावेद शेख वि.वि.अनित टिर्की[2] 13-15, 15-09, 15-04;

50 वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
निरंजन मंत्री वि.वि.अमित पाटील[2] 15-07, 15-12;
शशीकुमार अय्यर वि.वि.सुनील कट्टीकुलम 15-12, 15-08;
आनंद कृष्णमूर्ती वि.वि.रवी कुमार 15-03, 15-07;
संतोष ढोरे[1] वि.वि.अमित हिरेमठ 15-13, 15-12;