सेव्हन अ साईड फुटबॉल स्ट्रायकर्स १३ वर्षांखालील गटातून अंतिम फेरीत

पुणे, 17 जानेवारी 2023 ः सिटी स्पोर्टस अरेना येथए सुरु असलेल्या सिटी प्रिमियर लीग सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या पर्वात अंतिम फेरी गाठणारा सक्सेस स्ट्रायकर्स हा पहिला संघ ठरला. स्पोर्टस फौंडेशन पुणेच्या वतीने सिटी एफसी संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्ट्रायकर्स संघाने १३ वर्षांखालील गटातून सर्वाधिक गुण मिळवून सर्वप्रथम अंतिम फेरीत स्थन मिळविण्याचा मान मिळविला. स्ट्रायकर्स संघाने सर्वात प्रथण डायमंड ड्रॅगर्सला १-० असे पराभूत केले. सोहम चौधरीने हा गोल केला. त्यानंतर नील चव्हाण आणि रोहित नलवाड यांनी केलेल्या गोलच्या जोरावर आदित्य ऑलस्टार्स संघाचे आव्हान २-१ असे मोडून काढले.

स्पर्धेतील १५ वर्षांखालील गटातून ज्योती जग्वार्सने अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या. त्यांनी अभय आणि प्रथमेश सागर यांनी केलेल्या गोलच्या जोरावर स्ट्रायकर्स संघाचा २-० असा पराभव केला.

निकाल –

९ वर्षाखालील : डायमंड डॅगर्स : १ (अनुज शिरोटे १३वे मिनिट) बरोबरी वि. मॅट्रिक मार्व्हल्स १(दक्ष अग्रवाल २रे मिनिट); निरागस नाइट्स : ४ (युझरसीफ शेख ३, १२, २२वे मिनिट, आराध्य पाटील १७वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स : ०; डायमंड डॅगर्स : १ (अनुज शिरोटे ५वे मिनिट) बरोबरी वि. निरागस नाईट्स १ (युझरसीफ शेख २३वे मिनिट); मॅट्रिक मार्व्हल्स : २ (माधवन ८, १९वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स : १ (अमेय पवार ४ थे मिनिट)

११ वर्षांखालील : नक्षत्र चित्ताज ४ (निर्वाण वानखेडे ११वे, मिनिट, विहान जरंडे १७, २१वे मिनिट, सुजय लेंका ३रे मिनिट) वि.वि. जीएएनस गनर्स : ०, गोल्डन गार्डियन्स : १ (अनय जाधव २रे मिनिट) वि.वि. निरागस नाइट्स : ०, जीएनएस गनर्स : १ (वेद ब्रह्मे ६वे मिनिट) वि.वि. गोल्डन गार्डियन्स : ० निरागस नाईट्स : १ (अवनीश जोशी १९वे मिनिट) बरोबरी वि. नक्षत्र चित्ताज १ (विहान जरांडे १७वे मिनिट)

१३ वर्षांखालील: सक्सेस स्ट्रायकर्स : २ (सोहम चौधरी ८वे मिनिट स्वयं गोल) वि.वि. डायमंड डॅगर्स : ०, आदित्य ऑलस्टार्स : २ (अधिनाथ अभय ११वे मिनिट, आयुष कुराकुरी १६वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स : ०, सक्सेस स्ट्रायकर्स : २ (नील चव्हाण ५वे मिनिट, रोहित नलवाड १४वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स : १ (अधिनाथ अभय २०वे मिनिट); डायमंड डॅगर्स : ३ (अंशुमन खिराडे १२वे मिनिट आदित्य भालेराव १६वे मिनिट, खुशी पटेल २१वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स : ०

१५ वर्षांखालील : नक्षत्र चित्ता : ३ (आदित्य गावडे ३ रे मिनिट, सिद्धांत सुरवसे ६वे मिनिट अद्वैत मदनगरली १८वे मिनिट) वि.वि. टीएमपी वाघ : ०; मॅट्रिक मार्व्हल्सः ४ (अश्मित दास २रे मिनिट, शिवम पाटील १३ आणि २२वे मिनिट, पियुष दांगट १८वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : १ (राजवीर बारगुजर), नक्षत्र चित्ता : ३ (आदित्य गावडे ५वे मिनिट, अद्वैथ मदनगरली १८वे मिनिट, सिद्धांत सुरवसे २१वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स: १ (चिन्मयसाई नारायणन ४थे मिनिट), मॅट्रिक मार्व्हल्स : १ (शिवम पाटील ३रे मिनिट) वि.वि. टीएमपी टायगर्स: ०

15 वर्षांपेक्षा अधिक – प्रबल पँथर्स : ० बरोबरी वि. सक्सेस स्ट्रायकर्स : ०; प्रबल पँथर्स : २ (सोहम चौधरी ११, १८वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स : १ (माधव अभय १५वे मिनिट); आदित्य ऑलस्टार्स : २ (दत्तात्रय देवकाते ६वे मिनिट, माधव अभय १७वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स: १ (ललित पाटील १०वे मिनिट); ज्योती जग्वार्स : २ (प्रथमेश सागर १७वे मिनिट, अभय १६वे मिनिट) वि.वि. सक्सेस स्ट्रायकर्स ०.