पुणे, २१/११/२०२२: राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या २४ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व कवी शंकर आथरे यांची, तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध दंतरोपण तज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
शंकर आथरे यांच्या वसुंधरा, द्वारका, सावधान यम येत आहे, गगनांच्या अंगणी, छान छान गोष्टी आदी साहित्यकृती प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी दुसऱ्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचे, तसेच बंधुता काव्य महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविले आहे. आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
डॉ. विजय ताम्हाणे यांनी १८ व्या बंधुता साहित्य संमेलनाचेही स्वागताध्यक्ष पद भूषविले होते. त्यांनीही आजवर विपुल लेखन केले आहे. संमेलनाच्या तयारीसाठी निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, संघटक प्रकाश जवळकर आणि बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रशांत प्रकाश रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे रोकडे यांनी नमूद केले.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू