शरद पवारांनी ५० वर्ष जातिवाद केला चंद्रकांत पाटील यांची टीका 

पुणे, २३/ ०२/२०२२:  नवाब मलीक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मुस्लिम कार्यकर्ता असेल तर त्याला दाऊदचा माणूस म्हटले जाते अशी टीका केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘शरद पवार हे नेहमीच समाजात जातिवाद निर्माण करतात, कधी मराठा विरुद्ध बिगर मराठा तर कधी अल्पसंख्याक विरुध बिगर अल्पसंख्यांक वाद निर्माण करतात. हे गेले ५० वर्ष हेच करत आले आहेत, त्यामुळे याला बिगर अल्पसंख्याक जास्त महत्व देणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदते चंद्रकांत पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप सूडबुद्धीने राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडीची नोटीस आली तर कशाला घाबरता, कर नाही तर डर कशाला? असा प्रश्‍न विरोधकांना उद्देशून करत, राज्यातील पोलिस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या जून्या केसेस काढल्या जात आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

 

 

‘‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली तेव्हाही असेच आरोप झाले, मात्र कालांतराने हा आवाज क्षीण होत जातो, कोण देशमुख, कोण भुजबळ अशी चर्चा त्यांच्याच पक्षामध्ये सुरू होते. त्यामुळे अशा आरोपांमध्ये तथ्य नाही. देशात कायदे आहेत, न्यायव्यवस्था असताना भाजपच सत्तेचा दुरुपयोग करत आहे असे म्हणणे योग्य नाही. उलट राज्य सरकारच्या विरोधात आम्ही न्यायालयातूनच प्रत्येक निर्णय बदलला आहे. तसेच राज्यात सात मार्च नंतर मोठी कारवाई व १० मार्च नंतर राज्यात सत्तांतर होईल असा माझा अंदाज मी व्यक्त केला आहे. ते होईल का ते मला माहीत नाही, पण माझे अंदाज कधी चुकत नाहीत, असेही पाटील सांगितले.