पुणे, 17 फेब्रुवारी 2024: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात शौनक सुवर्णा, नमिश हुड, आरव नाईक यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत आरव नाईकने अरित्र भट्टाचार्यचा6-3, 3-6, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव केला. चुरशीच्या लढतीत शौनक सुवर्णा याने अंशुल पुजारीचा 3-6, 6-0, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव केला. नमिश हुडने अखिलेश चव्हाणचा 6-1, 6-0 असा तर, अनिश वडनेरकरने विवान मल्होत्राचा 6-1, 6-2 असा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.
आरुष पोतदारने स्वप्नील वडलेला 6-1, 6-0 असे सहज पराभुत केले. किशले शर्माने आयुष इंगळेचे आव्हान 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. अवी मिश्राने अथर्व बारावस्करचा 6-2, 6-1 असा पराभव केला.
निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
आरव नाईक वि.वि.अरित्र भट्टाचार्य 6-3, 3-6, 11-9;
नमिश हुड वि.वि.अखिलेश चव्हाण 6-1, 6-0;
अनिश वडनेरकर वि.वि.विवान मल्होत्रा 6-1, 6-2;
शौनक सुवर्णा वि.वि.अंशुल पुजारी 3-6, 6-0, 10-7;
आरुष पोतदार वि.वि.स्वप्नील वडले 6-1, 6-0;
अवी मिश्रा वि.वि.अथर्व बारावस्कर 6-2, 6-1;
किशले शर्मा वि.वि.आयुष इंगळे 6-3, 6-3;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय