पुणे, १४ जानेवारी २०२३: पुण्यात आज(शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चीतपट करून विजयी झाला. यामध्ये राक्षेला बक्षीस म्हणून महेंद्रा थार ही गाडी व पाच लाख रुपये रोख देण्यात आले. तर उपविजेच्या गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस देण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडला धवलसिंह मोहिते-पाटलांकडून चांदीची गदा भेट देण्यात आली.
माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड हा सिकंदर शेख याला पराभूत करून अंतिम फेरीत पोहचला होता. तर गादी विभागातून शिवराज राक्षे अंतिम फेरीत पोहचला होता, त्याने हर्षवर्धन सलगीर याचा पराभव केला होता.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड तालुक्यातील राक्षेवाडी गा
वातील पैलवान आहेत. शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले.
प्रशिक्षक काका पवार आणि गोविंद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काका पवार म्हणाले, “आम्ही खूप मेहनत केलेली होती, यावेळी देखील आम्हाला आशा होती की फायनलला दोन्ही खेळाडू आमचेच येणार. एक फक्त सिकंदरसोबतची मातीतली कुस्ती होती. पण आता दोन्ही जिंकल्यानंतर दोन्ही पैलवान आमच्याच तालमितले आहेत, त्यामुळं खूपच आनंदी आहे.
गोविंद पवार म्हणाले, “मला शंभर टक्के आत्मविश्वास होता की दोन्ही पैलवान माझ्या तालमितलेच असतील. यासाठी मी एक वर्षापासून मेहनत घेत होतो. आणि तिच मला माऊलीच्या आशीवार्दान फायनलला आलेत”
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा